top of page

भोंदू खरातसह त्याच्या पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल शिर्डीतील भूखंड प्रकरण, दोघे ताब्यात, कल्पना खरात फरार; मुलगा हर्षवर्धन खरातला पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिक : एसआयटीने अशोक खरातचा मुलस घेतले ताब्यात एसआयटीच्या ताब्यात

भोंदू अशोक खरात पत्नीची चौकशी करायला गेलेल्या नाशिक पोलिसांनी अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी जलदगतीने हालचाली करत ही कारवाई केली आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर ती फरार झाल्याची माहिती समोर आली आह आता पोलिसांनी अशोक खरातच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली.


अशोक खरातसोबत त्याची पत्नी कल्पना खरातवर शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नाशिक पोलिस कल्पना खरातची चौकशी करण्यासाठी खरपातच्या निवास्थानी गेले. मात्र, कल्पना खरात आधीच फरार झाल्याची माहिती समोर आली. यावेळी घरात असलेल्या अशोक खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर कल्पना खरातच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथकं नाशिक आणि शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहे.


दरम्यान, शिर्डीतील 4 भूखंड खरेदीप्रकरणी अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशेाक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डितील मध्यस्थ अरविंद बावके , किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती आहे. अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व व्यवहारांची एसआयटी चौकशी करत आहे. आपलं सावज हेरण्यासाठी भोंदू खरात वेगवेगळ्या सीकार्डचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. त्यातला एक नंबर खरात केवळ महिलांसाठी तर दुसरा नंबर केवळ व्हीआयपी भक्तांसाठी वापरत होता. या नंबरवरून त्याचा काही राजकीय नेते व प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असावा असा संशय आहे.


तिसर्‍या मोबइल क्रमांकावरून अशोक खरात आपले आर्थिक व्यवहार पाहत होता. तर चौथा मोबाईल क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. विशेष तपास पथक या चारही मोबाईल क्रमांकावरून झालेल्या संभाषणाची माहिती मिळवत आहे. अशोक खरातची बुधवारी पोलिस कोठडी संपणार असून, त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याची पुन्हा पोलिस कोठडी मिळावी यासाठी अधिकाधिक पुरावे गोळा करण्याचं काम एसआयटी करत आहे.


दरम्यान कल्पना अशोक खरात यांच्या विरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अशोक खरात याच्या नाशिक येथील बंगल्यात कल्पना खरात यांना ताब्यात घेण्यासाठी दाखल झाली. बंगल्याच्या गेटवरून अनेकवेळा दरवाजा ठोठवला असता आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी सिनेस्टाईल मार्ग अवलंबत शेजारच्या बंगल्यातून उड्यामारून अशोक खरातच्या बंगल्यात प्रवेश केला. यावेळी कल्पना खरात मिळून आल्या नाहीत. अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन अशोक खरात यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हर्षवर्धन खरात याची चौकशी करून सुटका करणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून माहिती मिळत आहे.

 
 
 

Comments


bottom of page