अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची घुसखोरी; चीन सोबत पारंपारीक शस्त्राने लढण कठीण सेना प्रमुखांच्या दाव्याने खळबळ, काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्षावर आयटीबीपीचे महासंचालक शत्रूजित कपूर यांनी दिलेल्या माहितीनंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या मुद्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. सीमावर्ती भागातील तणाव आणि चीनसोबत वाढत्या व्यापारावरून काँग्रेसने केंद्र सरकारच्या धारेणांवर जोरदार टीका केली आहे. चीनसमोर गुडघे टेकणार्या पंतप्रधानांचा एकीकडे सतत सवलतींचा सिलसिला सुरू आहे. दुसरीकडे चीनी सैनिक भारताच्यवा सीमेत घुसल्याने संघर्ष सुरू आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार या गंभीर मुद्यावर गप्प असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टिकास्त्र डागलं आहे.
आयटीबीपीचे महासंचालक शत्रूजित कपूर यांच्या दाव्यानुसार चीन चा सामना आपण परंपारीक पद्धतीने करणं आता शक्य नाही, कारण त्यांची पीएलए आणि बीडीआर त्यांची जी पारंपारीक शस्त्र आस्त्र जी आहेत त्यात त्यांनी मोठे बदल केले आहेत. त्यामुळे ते खूप पुढे निघून गेले आहेत. परंतु ड्रोन एक अशी उपकरण आहे की अपेक्षाप्रमाणे लहान देशही मोठ्या देशाला टक्कर देऊ शकतो. यावर त्यांनी रसीया- युक्रेनच्या संघर्षाचा दाखल देत रसीयाला वाटलं होतं युक्रेनला आम्ही एक दोन महिन्यात गुंडाळू परंतू युक्रेनने ड्रोनच्या साह्याने बलाढ्य रसीयाला गेली चार वर्षे झुंजावत ठेवलं आहे. युक्रेन अद्याप माघार घ्यायला तयार नाही. प्रत्येक महिण्याला आपण पाहतो की रसीयाचे दहा ते पंधरा हजार सैनिक मारले गेल्याच्या बातम्या येत आहेत. तसंच आपण पाहिलं आहे की, इरान अमेरिका एवढी मोठी महाशक्ती आहे मात्र इरानकडे अत्याधुनिक ड्रोन, आहेत तसेच सैनिक ही आहेत पण इरानला यामध्ये सेनेची गरजच भासली नाही.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आयटीबीपी महासंचालकांचे वक्तव्य सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोपकेले आहेत. एकीकडे चीनसमोर नरमाईची भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये चीनी सैन्यासोबत भारत सीमेच्या आत सतत संघर्ष होत आहेत. या गंभीर मुद्यावर पंतप्रधान आणि त्यांचे संपूर्ण प्रशासन मौन बाळगून आहेत, असंही ते म्हणाले.
दरम्यान, ताकसिंगमधील संघर्षानंतर गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील वाचा आणि दमाई येथे कोर कमांडर स्तरावर चर्चा झाली होती. लडाखप्रमाणेच अरुणाचलमध्येही गस्तीचे काही महत्वाचे बिंदू भारताच्या हातातून निसल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. चीनकडून सातत्याने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या शहरांची नावे बदलली जात असून ब्रम्हपुत्रा नदीवर 60 हजार मेगावाट क्षमतेचा महाकाय बांध बांधत आहे . हा प्रकल्प भारताच्या पर्यावरणीय सुरक्षेसाठी आणि जल सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
चीनसोबतच्या वाढत्या व्यापारावर जयराम रमेश यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारत चीन व्यापार तूट 2025-26 मध्ये विक्रमी 112 अब्ज डॉलरवरप पोहोचली आहे. हे तूट मागील वर्षी 19 अब्ज डॉलर होती. या प्रचंड व्यापार तुटीमुळे देशातील अनेक एमएसएमई अद्योग उध्वस्त झाले आहेत. ‘ मेक इन इंडिया’ ही मोहीम आता ‘इम्पोर्ट फ्रॉम चाइना’ मध्ये बदलली असून ही स्थिती देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी एक मोठी आव्हान असल्याचंही जयराम रमेश यांनी नमूद केलं आहे. 19 जून2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला दिलेली ‘ क्लिन चिट’ आणि लडाखमधील चीनी सैन्याच्या घुसखोरीच्या काळात माजी लष्करप्रमुखांना मिळालेल्या निर्देशांचा दाखला देत काँग्रेसने जुन्या घटनांची आठवण करून दिली आहे. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी चीनी सैन्याच्या घुसखोरीवर मोठी माहिती उघड केली होती. जे योग्या वाटेल ते करा, असे निर्देश त्यावेळी देण्यात आल्याचे नरवणे यांनी सांगितल्याचे जयराम रमेश म्हणाले.
उपसेनाप्रमुख लेप्टनंट जनरल राहुल सिंह यांनी 4 जुलै 2025 रोजी ‘ ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्यसा सैन्य कारवायांमध्ये चीनच्या व्यापक हस्तक्षेप आणि सहभाग हा जाहीर केला होता. पण, 25 ऑगस्ट 2026 रोजी पूर्व सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी लेफ्टिनेंट जनरल राहुल सिंह यांचे दावे सार्वजनिकरित्या नकारले होते. निवृत्तीनंतर लगेचच त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी संबंधित एका प्रमुख थिंक टँकची जबाबदारी स्वीकारल्याची टीकाही जयराम रमेश यांनी केली. देश प्रश्न विचारतोय, सीमेवर तणाव सुरु असतानाही चीनबाबत इतकी नरमाई आणि आर्थिक आघाडीवरील वाढती निर्भरता हा कोणता राष्ट्रवाद आहे? देशाला 56 इंचच्या छातीचे पोकळ दावे नाही तर राष्ट्रीय सुरक्षेवर स्पष्टीकरण हवे असल्याचा हल्लाबोल जयराम रमेश यांनी केला.



Comments