top of page

तिबेटला तीव्र भूकंपाचा धक्का; मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी ! भूकंपाचा केंद्रबिंदू , भूकंपाच केंद्रबिंदू जमिनीखाली 173 किलोमिटर

42 minutes ago
1 min read

तिबेटमध्ये मोठ्या भूकंपाची घटना घडली आहे. भूकंप झालेला प्रदेश हा चीनच्या ताब्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 7.0 रिश्टर स्केलचा मोठा भूकंपाचा धक्का बसला आहे. मोठी वित्त व जीवित हानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आठ वाजून तीन मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला आहे.


तिबेटमध्ये 7.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. मिळालेल्या माहिती भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 173 किलोमिटर खोल होता. दरम्यान, बाधित भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यूपर्वी 8 सप्टेंबर रोजी भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये भूकंप झाला होता. तिबेट आणि नेपाळच्या आसपाचा प्रदेश भूकंपप्रवण मानला जातो. 26 ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ भस्खलनामुळे मोठा पूर आला होता. ज्यामध्ये घरे, रस्ते आणि पूल वाहून गेले. यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण बेपत्ता झाले. तेव्हापासून बाधित भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.


सन 2025 मध्ये तिबेटमध्ये 7 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यात सुमारे 100 लोकांचा मृत्यू आणि 50,000 घरांचे नुकसान झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू माऊंट एव्हरेस्टच्या ईशान्येला अंदाजे 75 किलोमिटर अंतरावर आणि नेपाळच्या जवळ होता. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, गेल्या शतकात प्रभावित क्षेत्रात 6 तीव्रतेचे किमान 10 भूकंप झाले आहेत.

तिबेट प्रदेश त्याच्या भूकंपीय हालचालींसाठी ओळखला जातो. हे भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या टक्करीमुळे होते, ज्यातून हिमालयाची निर्मिती झाली. ऐतिहासिक आकडेवारी दर्शवते की या प्रदेशात अनेक भूकंपीय हालचाली झाल्या आहेत. ज्यामुळे तो सर्वात जास्त भूकंपीय सक्रिय प्रदेशांपैकी एक बनला आहे.

Comments


bottom of page