top of page

ज्ञानेश कुमारांविरोधात आंतरराष्ट्रीय डंका, ध्रूव राठीचे लंडनमध्ये ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन

6 hours ago
2 min read

युट्यूबर ध्रूव राठी लंडनमध्ये पाहोचताच आपल्या ट्यूटर हँडलवर एक्स पोस्ट करत ‘ आता वाजणार आंतरराष्ट्रिय डंका’ म्हणत थेट ब्रिटनची राजधानी लंडनच्या पार्लमेंट स्वेअर समोर ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ’लहरा दो तिरंगा’ आंदोलन केले.


भारताच्या राजकीय वातावरणाचे आता सातासमुद्रापार पडसाद उमटल्याचे चित्र आज लंडनमध्ये झालेल्या आंदोलनाने दिसून आले. यूट्यूबर ध्रूव राठी यांनी भारतात आल्यानंतर सीजेपीच्या दिल्लीतील जंतरमंतरवरील 10 ऑक्टोबरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांच्या बंगळूरु येथील रॅलीत सहभागी होत ध्रूव राठी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीच्या दिल्ली येथील जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी होण्याचे अवाहन करत ज्ञाणेश कुमार यांच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली होती.


कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी( दि. 10 ऑक्टोर) च्या आंदोलनापूर्वीच सीजेपीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची धरपकड केली, सरकारने दिल्लीकडे धावणार्‍या रेल्वे रद्द करत मेट्रो स्टेशन बंद केले होते. दिल्ली पोलिस, सुरक्षा यंत्रणेकडून सात हजारांवर आंदोलकांना ताब्यात घेवून डिटेन सेंटरमध्ये स्थानबद्ध केले. ध्रूव राठी यांना गुरुग्राममधून ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले, तर अभिजीत दिपके, अशुतोष रांका, सौरव दास यांना विमान प्रवासादरम्यान लँडिंग नंतर दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेतले. आंदोलनाच्या तयारीत असलेल्या ऑल इंडिया स्टूडंट फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांना आंदोलनाचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेतले होते.


त्यानंतर सीजेपीचे अशुतोष रांका, सौरव दास यांनी सरकारने आंदोलनासाठी प्रतिबंदीत केलेल्या जंतरमंतरवर तिरंगा फडकवला. प्रतिबंधीत आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह 10 ते 15 सीजेपी आंदोलकांना अटक केली. न्यायालयाने त्यांची रवानगी कोठडीत केली. त्यामुळे आजीच्या विधीकार्यासाठी आलेल्या अभिजीत दिपके यांनी तातडीने दिल्ली गाठत ‘ देशात तिरंगा फडकवणे गुन्हा आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित करत 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीत ‘ लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक दिली.


‘ लहरा दो तिरंगा ’ आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना रात्री ताब्यात घेतले. सीजीपी आंदोलनाच्या समर्थनार्थ धु्रव राठी यांनी ब्रिटनमध्ये पोहचताच मध्यरात्री एक्स पोस्ट करत ‘ आता आंतरराष्ट्रिय डंका वाजणार ’ असं म्हणत ब्रिटेनची राजधानी लंडनच्या पार्लमेंट स्वेअर समोर आंदोलनाची हाक दिली होती. दुपारी लंडनच्या पार्लमेंट स्वेअर समोरील महात्मागांधी यांच्या पुतळ्यासमोर धु्रव राठी यांच्यासह आंदोलकांनी सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ तिरंगा फडकवत मोदी, शाह, ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. लोकशाहीमध्ये आपल्याच देशात आपल्या देशाचा ध्वज फडकवण्यास सरकार मनाई करत आहे, याला लोकशाही म्हायचं का? इथे ब्रिटेनमध्ये भारताच ध्वज फडकवून आंदोलन केले जाते याला लोकशाही म्हणतात असा सवाल उपस्थित करत धु्रव राठी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

Comments


bottom of page