top of page

भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या दरबारी, तीन आयएएस अधिकारी?; अटकेपूर्वी शिर्डीतील त्या बैठकीने खळबळ एसआयटीकडून कसून चौकशी सुरू; तीन महिला तक्रारींसाठी पुढे

नाशिक : नाशिकमधील अत्याचारी बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कृत्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. खरातचे अनेक संतापजनक व्हिडिओ समोर आले आहेत.


अत्याचारी कॅप्टन अशोक खरात याची एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार येत आहे. अशोक खरात हा केवळ अघोरी पूजा नव्हे, तर सरकारी तिजोरी आणि नैसर्गिक संसाधनांवरही त्याची पकड होती खरात याचे सरकारी पातळीवर मोठ्या ओळखी होत्या. इतकच नव्हे तर आयएएस अधिकार्‍यासोबतही त्याने भेट घेतल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.


दरम्यान, शिर्डीतील एका नामांकित पंचरांकित हॉटेलमध्ये आरोपी अशोक खरात याने 3 आयएएस अधिकारी याच्या सोबत भेट घेतल्याची धक्कादाय बाब समोर आली आहे. खरातयाच्या अटकेच्या तीन दिवसांपूर्वी ही बैठक झाल्याची माहिती आहे. विनोद नावाच्या व्यक्तीनं ही भेट घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. हे तीन आयएएस अधिकारी कोण यांची नावं काय आहेत. याबाबतही सवाल उपस्थित होत आहेत. शिर्डीतील चार एकरच्या भुखंडावरील गहू कापणीच्या दिवशी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी कॅप्टन खरातचे शिर्डीत मोठे लागे-बांधे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


एसआटी टीमकडून अत्याचारी बाबा अशोक खरातची चौकशी करण्यात येणार आहे. महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणी अशोक खरातवर गुन्हा करण्यात आला आहे. एसआटी टीमकडून आज पुन्हा खरातची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सिन्नर-शिर्डी महामार्गावर भोंदूबाबा खरात कुटुंबीयांचे हार्डवेअरचं भव्य दुकान असल्याचंही समोर आलं आहे. वावी वेस परिसरात असलेले शिवसंकल्प हार्डवेअर दुकान खरातच्या पत्नीच्या नावावर आहे. खरातच्या नावावर कोट्यावधींची बेनामी जमीन जसेच अनेक बांधकाम व्यवसायातही भागीदारी असल्याची चर्चा आहे.


एसआयटीकडून अशोक खरातची सहा तासापासून चौकशी:

आरोपी अशोक खरातने शेकडो महिलांचे शोषण केल्याची माहिती समोर आली असून त्याबाबत डिटेल माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे, सध्या तीन महिला तक्राद देण्यासाठी पुढे आल्याची माहिती मिळाली आहे, आणखी काही महिला पुढे येण्याची शक्यता आहे, नाशिक आणि आहिल्यानगरच्या सर्व पोलिस ठाण्यामध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंच्या तक्रारींची माहिती घेण्याचं काम सुरू आहे, कॅप्टन खरातचे कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कॉम्प्युटर, हार्डडिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू, कॅप्टन अशोक खरात यांच्या मोबाईलमधील सर्व संभाषणाचे सीडीआर काढण्याचे देखील काम सुरू आहे.

Comments


bottom of page