top of page

मंत्री भुजबळांनी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीकडे पाठ फिरवली!


ree

मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय (जीआर) जारी केला. ज्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये आल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दूसरीकडे समाजाला आरक्षण दिल्याबद्दल सरकारने जीआर काढला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अखेर पाच दिवसांनी काल उपोषण मागे घेतले. सरकारकडून त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, आता ओबीसी समाज आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ओबीसीचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी जीआर संदर्भात वकिलांचा सल्ला घेत असल्याचे स्पष्ट करत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.


मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत असल्याने ओबीसींमध्ये नाराजीचा सूर आवळला जात आहे. हेच नाही तर सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढल्यानंतर छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूसन दूर राहण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले की, मराठवाड्यातील प्रत्येक मराठा हा ओबीसी आहे. आता ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार असल्याचे ओबीसींचे म्हणणे आहे.


ओबीसीमधून मराठा आरक्षण देऊ नये, याकरिता छगन भुजबळांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यामध्येच सरकारने ओबीसींसदर्भात थेट जीआर काढला आहे. सरकारने दिलेल्या जीआरच्या विरोधात अनेकजण कोर्टात जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले आहे. पाटील म्हणाले की, कोणी कितीही कोर्टात याचिका दाखल केल्या तरी काही फरक पडणार नाही. कारण जीआर हा सरकारी दस्तावेज आहे.


त्यामुळे त्यांना कोणाला नाकारता येणार नाही आणि कोणी नाकारूही शकत नाही. जर हे कोर्टात जाणार याचा आनंद आहे. याचा पक्का अर्थ मराठे आरक्षणात गेले. याचा अर्थ सगेसोयरे आणि मराठे आणि कुणबी एक आहे ही मागणी सोडणार नाही. टप्या टप्याने मी आणणार आहे सगळं, असेही जरांगे पाटील म्हणाले. आता मंत्री छगन भुजबळ हे नेमकी काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मराठा समाजास ओबीसीमधून आरक्षण लागू करण्यात आल्याचा आरोप करत जालना, बीड, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यात स्थानिक ओबीसी नेत्यांकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान,ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत सरकारच्या हैदरबाद गॅझेटिअर संदर्भात जीआरची होळी करत ‘छगन भुजबळ आगे बढो’ ची घोषणाबाजी केली.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page