मंत्री भुजबळांनी राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं- गंगाधर काळाकुटे
- Navnath Yewale
- Oct 12, 2025
- 2 min read
अन्यथा लोकशाही मार्गाने रोखणार, भले लाठ्या-काठ्या खान्याची वेळ येवो, आमच्यावर गुन्हे दाखल होवो मागे हटाणार नसल्याचाही इशारा

मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याच्या मागण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या बीड येथे 17 ऑक्टोबरला ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्याची सामाजीक विन विस्कटण्यासाठी बीडे येथे येत आहेत. मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी घेवून ते बीडमध्ये येत असल्याने जिल्ह्याचा समाजीक सलोखा बिगडणार असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी माराठा सेवक गंगाधर काळकुटे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना सभेसाठी जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा आज पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.
समात परिषदेच्या वतिने मंत्री छगन भुजबळ यांच्या एल्गार सभेचे 28 सप्टेंबरला बीड येथील छत्रपती संभाजी महाराज ग्राऊंडवर एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. अतिवृष्टीमुळे हा कार्यक्रम तत्पुरता स्थगित केल्याचे मंत्री भुजबळ प्रसारमाध्यमांना म्हणाले होते. आता येत्या 17 ऑक्टोबरला समता परिषदेच्या एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काल भुजबळ समर्थक तथा समता परिषदेचे सुभाष राऊत यांनी गंगाधर काळकुटे यांच्यावर टीका केली होती. राऊत यांच्या टीकेला उत्तर देत गंगाधर काळकुटे यांनी पत्रकार परिषदेद्वारे राऊत यांचे आरोप फेटाळून लावत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाना साधला.
मराठा आरक्षणाचा इतिहास मांडत गंगाधर काळकुटे यांनी मराठा आरक्षण विरोधाचा कच्च चिठ्ठाच पत्रकार परिषदेत मांडला. राऊत यांच्या काळे कुटे यांचे उद्योग काढावे लागतील या आरोपाला सडकून प्रत्यूत्तर देत मी पीडब्ल्यूडी ची गुत्तेदारी करतो, पीडब्ल्यूडीचे तत्कालीन मंत्री (भुजबळ) यांना कमिशन देऊन कामं केली आहेत. बीड मधून त्यांना अॅब्यूलन्सद्वारे पैसा पाठवण्यात आला, शिवाय शिव भोजन थाळीच्या अनुदानात गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप करत राऊत यांच्या आरोपावर पलटवार केला.
गुत्तेदारीत टक्केवारी दिल्याशिवाय कामं मिळत नाहीत तसी टक्केवारी आरोप करणारांच्या मंत्र्यांनाही आम्ही दिलेली आहे. शिवाय अधिकार्यांपासून मंत्र्यांपर्यंत टक्केवारी द्यावी लागते हे नव्याने सांगायची गरज नाही. आमचे बॅनर कसे लागले, कुठून पैसा आला त्याची चौकशी करायची करा सगळा हिशोब आमच्याकडे आहे. आम्ही तुमचा हिशोब काढायचा ठरलं तर उगाच आमच्यामुळं अधिकार्यांना अडचण नको. एखाद्याच्या ताटात माती टाकणारे आम्ही नाहीत असे म्हणत गंगाधर काळकुटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाना साधला. छगन भुजबळ हे जिल्ह्याचा सामाजीक सलोखा बिगडवण्यासाठी येत आहेत. पहिल्यांदा त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि बीडमध्ये यावं, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने भुजबळ यांना बीडमध्ये येण्यास रोखू, भले आम्हाला लाठ्या काठ्या खान्याची वेळ येवो अथवा आमच्यावर गुन्हे दाखल होवो आम्ही मागे हटणार नसल्याचे म्हणत सभेपूर्वीच मंत्री भुजबळ यांना मराठा सेवक गंगाधर काळकुटे यांनी इशारा दिला आहे.



Comments