मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची डील?जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषदेतून खुलासे; धनंजय मुंडेचे नाव घेत केला घटनाक्रम उघड, कोण आहे पीए कांचन?
- Navnath Yewale
- Nov 7
- 2 min read

अंतरवाली: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्वाची पत्रकार परिषद घेतली. काल मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. जालना पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणार्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली असून यामध्ये एका बड्या नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे.
पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाने शांत राहण्याचे आवान केले आहे. “आज मी जे सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे. काल घडलेल्या घटनेमुळे खरा संदेश देणं गरजेचं आहे. मी आहे तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहवं. मी लढायला तयार आहे. आपले हातही खूप लांब आहेत हे त्यांना लक्षात आलं असेल. सतर्क रहा, सावध राहा आणि हुशार व्हा.”
“ मराठा समाजातील राज्यातील जेवढे नेते आहे, त्यांना हा विषय गंभीर घ्यावा. वेळ तुमच्यापुढे देखील येणार आहे. तुमच्यावरही वेळ येऊ शकते. विरोधात जाऊन भाषण करणारा परवडतो, पण कुणाचं तरी ऐकून जीवावर उठत असतील तर.. आजचा विषय गंभीर आहे. आरक्षण राजकारण, विरोध या वेगळ्या गोष्टी आहेत. ‘करून घेण्यापेक्षा’ करणारा जाबाबदार असतो. अशा वृत्तीचा नायनाट करावा लागेल सर्वांनी विषय तकदीने लावून धरला तरच नायनाट हाईल.”
“ पोलिसांनी आरोपींना पकडा किंवा सोडा, आम्हाला काही करायचं नाही. बीड जिल्ह्यातील प्रमुख नेते बसलेले होते. त्यामुळे जनतेच्या कोर्टात खरं काय आहे हे सर्वांना माहिती आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. प्रशासकीय बाबतीत मी बोलणार नाही. बीडचा एक कार्यकर्ता किंवा पी.ए.तो दोन आरोपींकडे गेला. हे दोन आरोपीआणि बीडचा पी.ए.यांनी हे संपूर्ण काम नेलं. घटनाक्रम येथून सुरू झाला.
पहिला मुद्दा- व्हिडिओ बनवा, दुसरा- खून करू, तिसरा- जेवनात गोळ्या देऊ, औषधं देऊ. अशा नीच प्रवृत्तीचा नायनाट झाला पाहिजे.”
“ बीडचा कांचन नावाचा माणुस आहे. तो धनंजय मुंडे यांचा पी.ए. किंवा कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे हे षडयंत्र रचत आहेत. बीडच्या पी.ए.ने आरोपींना घेऊन गेले. कांचन आणि धनंजय मुंडे यांची 20 मिनिटांची चर्चा झाली. परळीत सुरू असलेल्या बैठकीत एक नेता उपस्थित होता. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील करण्यात आली,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.



Comments