मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक
- Navnath Yewale
- Aug 27
- 1 min read

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ‘ चलो मुंबई’ ची हाक दिली आहे. बुधवारी (दि.27) ऑगस्ट जरांगे पाटलांसह लाखो मराठा बांधवांनी अतरवाली सराटी येथून मुंबईकउे कूच केली आहे. मुंबईत आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं आंदोलन होणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोनाच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या बैठक होणार आहे. सरकारच्या भूमिकेसंदर्भात आणि ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी दुपारी एक वाजता बैठक बोलावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीतून ओबीसी समाज काय भूमिका घेतो, हे पाहणं महत्वाचं आहे. नागपूर येथे बबनराव तायवाडे यांच्या राहत्या घरी ही बैठक पार पडणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी हजारो गाड्या आणि लाखो मराठा बांधवांसह मुंबईकडे कूच केली आहे. सरकारने जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी केवळ एक दिवसाची परवानगी दिलेली आहे. शिवाय गाड्या आणि आंदोलनाच्या संख्येबाबतही निर्बंध आणलेले आहेत.
असं असलं तरी मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मुंबईतल्या अझाद मैदानामध्ये ते आंदोलन करतील. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट लागू करण्याची त्यांची मागणी आहे. सरकार या सगळ्या माण्या पूर्ण करणार का, यात नेमका कुठला तोडगा निघणार, हे पाहणं महत्वाचं आहे.



Comments