top of page

मराठा मुलिंच्या लग्नाबाबत वदग्रस्त वक्तव्य; लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा

ree

राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला, या जीआरला ओबीसी समाजाकडून प्रचंड विरोध होत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको, स्वतंत्र आरक्षण द्या, अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. त्यामुळे या जीाआरनंतर पुन्हा एकदा ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने- सामाने आल्याचं पहायला मिळत आहे.


दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाचे मेळावे घेत ओबीसी आरक्षण बचावचा नारा दिला आहे.या पार्श्वभूमिवर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील श्रृंगारवाडी फाटा येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना हाके यांनी मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, या वक्तव्यानंतर यांच्याविरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून, त्यांना इशारा देण्यात आला आहे.


दम्यान, हाके यांना हे वादग्रस्त वक्तव्य आता चांगलंच भोवलं आहे. मराठा समाजातील मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाना साधला आहे. आतापर्यंत त्याच्यावर काही बोललो नाही, तुम्हाला आतापर्यंत बोललो नाही, लक्षात ठेवा तुमच्या लेकीबाळी मी माझ्या लेकीबाळी प्रमाणे समजतो.अजित पवारांचे दोन कार्यकर्ते भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना बोलता येत नसल्यानं त्यांनी हाकेला हाताखाली धरलं आहे, हाके हे भजबळ आणि मुंडे यांची भाषा बोलत असल्याचा आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे. ते स्वत: हातानं वाद ओढून घेतात, हे आता धनगर समाजाला देखील कळालं आहे, त्यामुळे ते देखील त्यांना जवळ उभे करत नाहीत असंही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.


छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज आक्रमक

दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले. शहरातील क्रांती चौकात लक्ष्मण हाके यांच्या प्रतीमेस जोडे मारो आंदोलन करत हाके यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही. जिल्ह्यात दिसेल तिथे चपलांनी सत्कार करण्याच्या संतप्त भावना मराठा माहिलांनी व्यक्त केल्या.

Comments


bottom of page