top of page

मराठा मोर्चात दंगली घडवण्याचा कट शीजलाय ! - जरांगे पाटील


आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ‘चलो मुंबई’ चा नारा दिला आहे. मोर्चाची तयारी अंतिम टप्यात आल्याचेही समन्वयांकडून सांगण्यात येत असतानाच आता ओबीसी अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप करत समाजस सावध राहण्याचे अवाहन केल्याने खळबळ उडाली आहे.


ree


मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन वर्षापासून आंदोलन छेडले आहे. सातत्याने उपोषण, मोर्चे, रास्ता रोको आंदोलन करूनही सरकार मागण्यांकडे दुर्लक्षाचा आरोप करण्यात येत आहे. मराठा समाज मुळाचा ओबीसी असल्याच्या जवळपास 52 लाख कुणबी नोंदी शिंदे समिती मार्फत समोर आल्या आहेत.


तत्कालीन शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या अश्वासनाप्रमाणे पुराव्यांचे ढिगारे असतानाही सरकार मराठा आरक्षण आंमलबजावणीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. शिवाय ज्यांच्या नोंदी अढळल्या त्यांनाही कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप थांबवण्यात आले आहे. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रोखले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हक्काच्या प्रवर्गातून प्रवेश प्रक्रियेस मुकावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.


प्राप्त पुराव्यानुसार राज्यातील सरसकट मराठा समाजास मराठा- कुणबी, कुणबी- मराठा एक म्हणून ओबीसीतून आरक्षण लागू करावे, हैद्राबाद संस्थान, सातारा संस्थान, कोल्हापुर संस्थानसह बॉम्बे गॅझेट लागू करावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे. राज्यभरातील मराठा बांधव 29 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर जरांगे पाटील राज्यभर दौर्‍यांच्या माध्यमातून आढावा घेण्यासह समाज बांधवांना अवाहन करत आहेत.


एकीकडे मराठा समाजाची आंदोलनाची तयारी सुरू असताना दूसरीकडे गोवा येथे नुकतेच ओबीसी अधिवेशन संपन्न झाले. ज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांना अश्वस्थ करत ओबीसींसाठी लढणार असल्याचा दावा केला. त्यावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला.


गोवा येथील ओबीसी अधिवेशनामध्ये मराठा आंदोलनात हिंदू-मुस्लीम, मराठा- ओबीसी दंगल घडवण्याचा कट रचल्याचा आरोप करत मराठा समाजाने वेळीच सावध राहण्याचे अवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. कितीही कट रचा आम्ही मुंबई गाठणारच, मोर्चातील एकही व्यक्तीच्या केसालाही धक्का लागता कामा नये, मराठे शांततेत मुुंबईला येणार यात शंकेचं कारण नाही. आम्ही संविधानाचे पुजक आहोत. कायदा हातात घेण्याचा प्रयत्नही होणार नाही. पण आंदोलकांवर प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे.

Comments


bottom of page