top of page

मराठा सेवक काळकुटे यांची मोबाईल दाखवत भुजबळवर टीका

... तर त्याच भाषेत प्रत्यूत्तर, गंगाधार काळकुटेंचा इशारा

ree

मराठा आरक्षण हैदराबाद गॅझेट च्या जीआरमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी बीड मध्ये ओबीसींचा एल्गार पार पडला. अखिल भारतीय महात्माफुले समता परिषदेच्या वतिने आयोजीत मेळास संबोधीत करताना मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा सेवक गंगाधर काळकुटे यांच्यावर काळतोंडे म्हणत जोरदार टीका केली. भुजबळाच्यां टीकेला प्रत्यूत्तर देताना काळकुटे यांनी मोबाईलमधील गोरीलाचे चित्र दाखवत आम्ही याची उपमा द्यायची का? असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला.


ओबीसी आरक्षण बचावचा नारा देत मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीडमध्ये नुकताच ओबीसी एल्गार मेळावा संपन्न झाला. मंत्री छगन भुजबळ हे संविधानीक पदावर आहेत, मंत्रीपदाची शपथ आठवून त्यांनी कुठल्याही एका जाती धर्माचा द्वेष अथवा ममत्वभाव जागृत करणे असंविधानिक आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी ते बीडच्या एल्गास सभेसाठी येत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात राहून शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात भुमिका घेणे शासनाचा अनादर असल्याचे म्हणत गंगाधर काळकुटे यांनी छगन भुजबळ यांनी प्रथम मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, त्यानंतर बीडच्या एल्गार सभेस यावं. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने, गनिमी काव्याने भुजबळ यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशाराही काळकुटे यांनी पत्रकार परिषदेतून दिला होता. दरम्यान, गंगाधर काळकुटे यांनी मंत्री छगन भुजबळ हे जिल्ह्यातील सामाजीक सलोखा बिगडविण्यासाठी जिल्ह्यात येत असल्याचा अरोप करत सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना समज देवून रोखण्यात यावे अन्यता त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मा. राज्यपाल महोदयांकडे केली होती.


मात्र, मंत्री छगन भुजबळ एल्गार सभेसाठी बीडमध्ये दाखल झाले. छगन भुजबळ बीडमध्ये दाखल होताच गंगाधर काळकुटे यांच्यासह मराठा सेवकांनी तुम्ही आमच्या जीआरला विरोध करता, काळा जीआर म्हणता, जीआर फाडता तर आम्हीही ज्या 1994 च्या जीआर नुसार तुम्हाला आरक्षण मिळाले आहे तो जीआर आम्हाला मान्य नाही, तो जीआरही रद्द करण्यात यावा अशी मागणी करत शहरातील माने कॉम्प्लेक्स समोर 1994 च्या जीआरची होळी केली.

कायदा सुवव्यवस्थेचा प्रश्नामुळे बीड पोलिसांनी गंगाधर काळकुटे यांना प्रतिबंधक कारवाईखाली जायबंद केले होते. एल्गार सभेस संबोधत करताना सुरुवातीलच छगन भुजबळ यांनी “ कोण तो काळतोंडे, म्हणे मला बीड मध्ये पाय ठेवू देणार नाही , आसे किती ही वाटं लावले” असे म्हणत छगन भुजबळ यांनी काळकुटे यांच्यावर टीका केली होती.


मंत्री छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्यूत्तर देत गंगाधर काळकुटे म्हणाले की, छगन भुजबळ यांची साठी बुद्धी नाठी झाली आहे. माझ्यासरख्या सामान्य कार्यकर्त्यांवर अशा अश्लाघ्य भाषेत टीका त्यांना शोभा देत नाही. आम्ही ही त्यांच्या टीकेला जशास तसं उत्तर देऊ शकतो, आम्हाला काहींनी अशा प्रकारचे फोटो पाठवले आहेत ( हातातील मोबाईलमध्ये गोरीला चे छायाचित्र दाखवत) मग आम्ही त्यांना या प्राण्याची उपमा द्यायची का? आमचा रंग सावळा आहे, भगवान श्रीकृष्णा चा रंगही सावळा होता. आता आमचं तोंड काळ म्हणाले ठिक आहे इश्वराने दिलेला तो वर्ण आहे. पण आम्ही तुमच्या अनुभवा सोबत वयाचा विचार करणारे आहोत. आम्ही तसं करणार नाही, मात्र, यापूढे ज्या भाषेत टीका त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल असा इशाराही गंगाधर काळकुटे यांनी दिला.

Comments


bottom of page