मराठे हिंदू नाहित का? आमचेच आमची जातच संपवायला लागलेत तर धर्म कसा टिकवायचा आम्ही - जरांगे पाटील
- Navnath Yewale
- Aug 10
- 2 min read
आहिल्यानगर (अहमदनगर) येथे पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधत त्यांना मराठा-ओबीसी, हिंदू- मुस्लीम दंगल घडवून आणायची आहे आसा आरोप केला. शिवाय आम्ही हिंदू नाहीत का? आमचेच आमची आम्हाला संपवायला निघालेत अशा खेदासह संताप व्यक्त केला.

मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला चलो मुंबई चा नारा दिला आहे. त्यापार्श्वभूमिवर राज्यभरता जरांगे पाटील यांचे दौरे सुरू आहेत. पश्चिम महारष्ट्राच्या दौर्यावर असलेल्या जरांगे पाटीलांनी आज आहिल्यानगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी हिंदू धर्मावरून काही पत्रकांरानी त्यांना प्रश्न विचारला असता जरांगे पाटील यांनी खेदजनक संताप व्यक्त केला.
जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना केवळ मराठा- ओबीसी, हिंदू -मुस्लीम एक राहिले तर मुस्लीमांसह इतरांचं काहीच करू शकत नाही ते. त्याला फक्त दंगली घडवून आणायच्या आहेत. आजपर्यंत आमचे मराठा, दलित, ओबीसी, मुस्लीम धड नव्हते म्हणून त्यांचे फावत आले. तुम्ही हिंदू म्हणता आम्ही मराठे जातवान हिंदू आहोत, आम्हाला गर्व आहे आमच्या धर्माचा पण, मुस्लीमांपासून कोणाला त्रास होतोय का? तर नाही. जेव्हा त्रास होईल तेव्हा पाहू. उगाच त्यांना दुश्मन समजण्यात काय आर्थ.
केवळ हिंदू म्हणूनच लढायचा मराठा पुढे लागतो का? मराठ्यांच्या लेकरांना कायमच आरक्षण देवून कर ना हिंदूनां मोठं ते लढायला सक्षम होतील. मुस्लीम काहीच म्हणत नाहीत त्यांच्याच मागं लागायचं. जे म्हणतेत त्यांना, आता आमचेच आमच्या मागं लागलेत. छगन भुजबळ कोण आहेत, हिंदु नाहीत का ते? त्यांना बोलाना, कि तु हिंदु आहेत कशाला विरोध करतोस आरक्षणाला. हिंदुच हिंदुला मारायला निघालाय आम्हाला.
हि कोणती पद्धत आहे तुमची, त्याला नाही का वाटत त्या छगन भुजबळ ला, की हिंदू मोठा व्हावा, हिंदूतला मोठा वर्ग आहे मराठा. म्हणजे मारामार्या कारयच्या आसल्या की हिंदू डोक्यात आला, आणि आरक्षण मागितलं की आर... आमच्यात नका येऊ तुम्ही. का हा हिंदु आहे का तुमचा असं म्हणत जरांगे पाटील यांनी सत्ताधार्यांवर निशाना साधत संताप व्यक्त केला.



Comments