top of page

मराठ्यांच वादळ आता दिल्लीत धडकणार!

मुंबई आंदोलनाच्या यशानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता चलो दिल्ली चा नारा दिला आहे. मात्र, दिल्लीत आता मराठे मागण्या घेऊन नाही तर, अधिवेशनासाठी जात असल्याचा उल्लेखही जरांगे पाटील यांनी केला. देशभराती मराठा एकत्रीत करण्याचा संकल्पही जरांगे पाटील यांनी धाराशिवमधून केला आहे.

ree

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभारला, त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठ यश आलं आहे. त्यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यात सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे. हा मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे, राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे.

याच दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे, मराठ्यांचं वादळ आता दिल्लमध्ये धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लमध्ये अधिवेशन घेणार आहेत. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहिर होणार आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी नंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे. धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.


मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती, लाखो मराठा बांधव हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहीागी झाले होते. या आंदोलनाला यश आलं, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत, तर काही मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागितला आहे. मराठा समाजाची जी मुख्य मागणी होती, राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करा त्याचा जीआर सरकारने काढला आहे, त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे.


मराठा,ओबीसी आमने-सामने


दरम्यान, राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा सरकारने जीआर काढल्यानंतर आता ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी समाजाकडून या जीआरला विरोध होत आहे. मराठा समाजाला आमच्यामधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे, तर दुसरीकडे याच गॅझेटवरून बंजारा समाज आणि आदिवासी समाज देखील आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. आमचा एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी बंजारा समाजाची आहे.

Comments


bottom of page