top of page

महिला आयोगाच्या राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरकडून अशोक खरातचा एकरी उल्लेख , पक्षाच्या महिला प्रदेशाध्यपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

मुंबई: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना अखेर राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले.अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यामागणीवर विरोधकांनी रान उठवले होते. अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी अशोक खरात यांच्यावर टीका कतर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली.


शिवनिका संस्थानमध्ये मी प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हापासून सदस्य म्हणून ट्रस्टवर काम केले होते. माझ्यासमवेत समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर या ट्रस्टवर होते. मी ट्रस्टची सदस्य होते, त्यानंतर मी मलिा अयोगाची अध्यक्ष झाले. या ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपुष्टात आला होता. समाजात आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरू मानत असतो. खरात पती-पत्नीला मी आणि माझ्या परिवाराने गुरु मानलं होतं. तिथे होणार्‍या कार्यक्रमांना आम्ही उपस्थित राहायचो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरू मानलं, त्यानिमित्ताने आम्ही कुटुंब उपस्थित राहत होतो. माध्यमांकडून दाखवले जाणारे व्हिडीओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत. गुरुपोर्णिमेच्यानिमित्ताने पाद्यपूजा अनेकांनी केली, तशी मी आणि अमाझ्या पतीनेही केली. पाच सहा वर्षापूर्वी आपण ज्या व्यक्तीच्या संपर्कात असतो, ते पाच-सहा वर्षांनी एखाद्याचे कृत्य, वैयक्तिक वागणूक,वैयक्तिक आयुष्य याबद्दल आपल्याला सुतराम कल्पना नसते.


आज जे आपल्यासोबत आहेत, ते उद्या पुऐ जाऊन कसं वागतील, ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्यामुळे मी ही घटना समजल्यावर मला धक्का बसला. मी लगेच ट्विटही केलं. या देवस्थान ट्रस्ट माझ्या कुटुंबाचा संबंध आहे. पण अशोक खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती असायचं कोणतंही कारण नव्हतं. या प्रकरणात पोलिसांनी खोलवर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती असायचं कोणतंही कारण नव्हतं. या प्रकरणात पोलिसांनी खोलवर आणि निष्पक्ष तपास करावा हे की आधीच सांगितले आहे. मी पोलिस महासंचकांना भेटून तपासाबाबत पत्र दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या घटनेचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शकपणे व्हावा, यासाठी मागणी केली.


आपण काही लोकांवर विश्वास ठेवता, आध्यात्मिक भावना असते. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. आमची खरातवर असणारी श्रद्धा आध्यात्मिक दृष्टीकोनातून होती. त्यामुळे खरातच्या ट्रस्टसोबत जोडले गेले. परंतु, खरातची दुसरी बाजू मला माहिती नव्हती. जे काही कृत्य घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे, घाणेरडं आहे त्याचं आम्ही कुठेही समर्थन करणार नाही. पोलिसांनी त्याचा तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करावी. माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो खरातसोबत आहेत. परंतु एक महिला म्हणून माझ्यावर आरेाप करण्यात आले यांच वाईट वाटतंय, अशी खंत रुपाली चाकणकर यांनी व्यक्ती केली.


प्रदेशाध्यक्षपादाच्या राजीनाम्याची मागणी : विकृत अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्याच पक्षाती (राष्ट्रवादी, अजित पवार) गटाच्या नेत्या अ‍ॅड. रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकरणकर यांनी दोन्ही राजीनामे द्यायला हवे होते. रुपाली चाकणकर सारखी बाई पक्षाची प्रदेशाध्यक्ष असेल तर माझ्यासारच्या महिला पक्षात काम करणार नाहीत, मग कोणत्या महिल्या काम करणार? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचबरोबर शिवसेना (उबाठा) च्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानावे, सामाजिक कार्यकर्त्या अंजलि दमानिया यांनीही रुपाली चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यामुळे रुपाली चाकणकर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार का? हे पाहावे लागणार आहे

Comments


bottom of page