मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकणार, जरांगे पाटलांचा ‘ मुंबई चाले चा नारा’; 15 सप्टेंबरला अंतरवलीतून प्रस्तान

अंतरवाली : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येेथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोशणाचा आज शनिवारी (दि.12) पंधरावा दिवस उजाडला. राज्यभरातून लाखो मराठा बांधव आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत पार पडलेल्या ऐतिहासिक व राज्यव्यापी महाबैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी अखेर बहुप्रतिक्षित मुंबईकडे कूच करण्याची अधिकृत घोषणा केली.
अंतरवालीमध्ये अयोजित महाबैठकीस संबोधित करताना जरांगे पाटील म्हणाले की, “आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जायचे आहे. गणपती बसल्यानंतर 15 सप्टेंबरला आपण निघायचे. रस्त्यात कोणी कितीही खुन्नस दिली तरी त्याला प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवू नका; डोळ्यांसमोर समाजाची वेदना आणि मुलांचे भविष्य ठेवा. कोणत्याही मार्गाने गेलो तरी यंदा जिंकूनच यायचे आहे.” असा एल्गार जरांगे पाटील यांनी जनसागरला संबोधित करताना केला.
दुपारी 12 वाजता बैठक सुरू होण्यापूर्वीच अंतरवाली सराटी परिसर मराठा बांधवांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेला होता. हातात भगवे झेंडे आणि डोक्यावर भगवे रुमाल फिरवत तरुणांनी परिसर दणाणून सोडला. “ एक मराठा लाख मराठा ” जय जिजाऊ, जय शिवराय” “ मुुंबई मुंबई .. आता कुठे जायचं? मुंबईला जायचं” “ लढेंगे, जितेंगे .. हम सब जरांगे ” मनोज दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” आणि “ आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं” अशा गगनभेदी घोषणांनी सांपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
उपस्थितांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. मुंबईला जाण्याचा आपला निर्णय पक्का आहे. शांततेच्या मार्गाने, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपण आपली ताकद दाखवणार आहोत. रस्त्यात कोण काय बोलते याकडे लक्ष देऊ नका. आपल्या लेकरांचे कल्याण करणे हेच आपले एकमेव ध्येय आहे.” जरांगे यांनी अद्याप मुंबईकडे निघण्याची तारीख जाहीर केली नाही.



Comments