महसूलमंत्री बावनकुळे यांना तुळजापुरात घेरावो
- Navnath Yewale
- Aug 8
- 1 min read
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज धाराशीव जिल्ह्याच्या दौर्यावर असतना तुळजापूर येथे तुळजाभवानीच्या दर्शनानंतर मराठा आंदोलकांना त्यांना घेरावो घालत मराठा आरक्षण आंमलबजाणी बाबत जाब विचारला. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येऊ देवू नका, सरकारला मराठ्यांचा उद्रेक पहायचा आहे का? अशा प्रश्नांचा भडीमार करत मंत्री बावनकुळे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे धाराशीव दौर्यावर आहेत आज त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. मंत्री बावनकुळे दर्शनानंतर मंदिर प्रांगणात आले असता मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट ‘चलो मुंबई’ चा नारा दिला आहे. या पार्श्वभूमिवर मराठा आंदोलकांनी मंत्री बावनकुळे यांना घेराव घालत सरकारला मराठ्यांचा उद्रेक पहायचा आहे का? मराठ्यांचा अंत पाहू नका, मनोज जरांगे पाटील यांना मुंबईकडे येण्याची वेळ येऊ देवू नका. ‘ जय भवानी जय शिवाजी’ एक मराठा, लाख मराठा ची घोषणाबाजी करत आंदोलकांनी मंत्री बावनकुळे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
आंदोलकांच्या मागण्यांवर मंत्री बावनकुळे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल मी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. मराठा समाजासोबत सरकार ठामपणे उभे आहे. मराठा आरक्षणाची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झाली होती. आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आरक्षणावर कायम चर्चासुरू असते. मी लवकरच मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मराठा आरक्षण प्रश्नावर सकारात्मक मार्ग काढण्याचे अश्वासनही मंत्री बावनकुळे यांनी दिले.



Comments