top of page

महादवे मुंडेंची हत्या धनंजय मुंडेनीच घडवून आणली, ब्रेन मॅपिंग अहवाल जाहीर करा; तुम्हा कोणी संपवत नाही, तुम्हीच परळीतल्या दहा लोकांना संपवलं- राजाभाऊ फड

बीड: परळीतील व्यापारी महादेव मुंडे प्रकरणात एसआटीने पाच जणांची ब्रेन मॅपिंग व काहींची नार्कोटेस्ट केल्याची माहिती एसआयटीकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात अद्याप आरोपी निष्पन्न नसून कोणालाही अटक झाली नाही. त्यातच आज राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक दावे करत महादवे मुंडे यांची हत्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच झाली असून ब्रेन मॅपिंगचा अहवाल जाहिर करण्याची मागणी केल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.


महादवे मुंडे यांच्या हत्येला दोन वर्षे चार महिन्याचा कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने सध्या एसआयटी मार्फत तपास सुरू आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त एसआयटीने अद्यापर्यंत शेकडोजणांची चौकशी व पाच जणांच्या ब्रेन मॅपिंग, नार्कोटेस्ट केल्या आहेत. यामध्ये दोघांच्या चाचण्या पॉझिव्ह आल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप आरोपी निष्पन्न नसल्याने या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही. त्यातच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांनी गुरुवारी (दि.5) पत्रकार परिषदेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात करत महादेव मुंडे यांची हत्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आल्याचं ब्रेनमॅपिंग चाचणीत समोर आल्याचा दावा केला आहे.

यावेळी राजाभाऊ फड म्हणाले की, महादेव मुंडे यांच्या हत्येला आज 2 वर्षे 4 महिने 14 दिवस झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची विशेष आभार त्यांनी पुढाकर घेवून तपासकामी एसआयटी नेमली. आयपीएस पंकज कुमावत सारख्या निष्णात अधिकार्‍याची यामध्ये नियुक्ती केली. त्यामुळे संशयितांच्या नार्कोटेस्ट, ब्रेनमॅपींग चाचण्या करण्यात आल्या, आम्हाला वाटलं की, कुठतरी आता आधार आणि न्याय मिळेल. महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांचे पुरवणी जबाब झाले. त्यानंतर तपास यंत्रणेने संशयितांच्या नार्कोटेस्ट,ब्रेन मॅपिंग केल्या. त्यानंतर सुद्धा अद्याप कुणालाही अटक झाली नाही, शिवाय झालेल्या चाचण्यांचा अहवाल अद्याप जाहीर केला नाही.


आज महादवे मुंडे यांच्या हत्येला 865 दिवस झाल्यानंतरही अद्याप आरोपी निष्पन्न केले नाहीत अथवा त्यांना अटक केली नाही. या प्रकणात सुरुवातीपासूनच स्थानिक आमदार तथा तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राजकिय दबाव आणून तपास थांबवला होता. धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरूनच हे सर्व प्रकरण थांबलं होतं. आणि धनंजय मुंडेच्या दबावामुळेच अद्याप अरोपींना अटक होवू शकलं नाही. महादेव मुंडे प्रकरणात आरोपींना धनंजय मुंडेंचे अभय मिळाल्यानेच महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर अनेक गुन्हे झाले, संतोष देशमुखांची हत्या झाली, बापु आंधळेचा मर्डर झाला असे आणखी प्रकरणं झाले. त्याचे कारण महादेव मुंडे प्रकरणाचा तपास धनंजय मुंडे यांनी दबावाखाली ठेवून आरोपी ओपन होवू दिले नाही.


का तर त्या प्रकरणात धनंजय मुंडे सहभागी होते का? असा आम्हाला संशय होता. महादेव मुंडे प्रकरणात ज्या पाच लोकांच्या ब्रेन मॅपिंग चाचण्या झाल्या त्यामध्ये आमच्या पर्यंत अशी माहिती मिळाली आहे की, यामागे स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांचा हात आहे. त्याच्यांच सांगण्यावरून महादेव मुंडे यांचा मर्डर झाला. प्रॉपर्टीचे कारण असतील, कोणी घेतले कोणाचा माणुस होता. ब्रेन मॅपिंग झालेल्या त्या पाच जणांनी स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांचं नांव घेतलं आहे. आम्ही हा मर्डर धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून केला आहे. तरीही त्या आरोपींना अटक केलं नाही आणि ज्यांनी हे घडवून आणलं त्या स्थानिक आमदाराचीही अद्याप चौकशी झालेली नाही.


आमचं असं म्हणणं आहे की या सर्व चाचण्यांचा अहवाल राज्यासमोर जाहीर करावा. ब्रेन मॅपींग च्या अहवालामध्ये संशयितांनी स्पष्ट स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं आहे. “ हे प्रकरण आम्ही धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून महादेव मुंडे यांचा मर्डर केला आहे.” तसं जर असेल तर आमची मुख्यमंत्री, एसआयटीला विनंती आहे की, धनंजय मुंडे यांना 120 (ब) अंतर्गत कारवाई करून आरोपी करण्यात यावं. जे दोषी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आहे. आच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर दि. 20 मार्च ला आम्ही परळी बंद ची हाक देवून ज्ञाणेश्वरी मुंडे यांचे माहेर आणि सासरच्या (कन्हेरवाडी-भोपळा) वतिने भगणीला सोबत घेवून रास्ता रोके करणार आहोत.


महादेव मुंडे यांच्या चिमुल्यांवर हल्ले होत आहेत, त्यांना संरक्षण मागितलं, मात्र अद्यापर्यंत त्यांना संरक्षण का? देण्यात आलं नाही. पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की परळीमध्ये जे प्रकरणं घडले त्यांना पोलिस रंक्षण द्या. महादेव मुुंडे प्रकरणात फार मोठे राजकारणी लोकं आहेत. ब्रेन मॅपिंगमध्ये ज्या लोकांची नावे पुढे आली आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे.

जो बोएगा वही पाएगा:

धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यात येत असल्याचे वक्तव्य केले होते या प्रश्नावर त्यावर राजाभाऊ फड म्हणाले की, मी त्यांना एकच सांगतो, कोणी कोणाला पृथ्वी तलावावरून संपवण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही किती लोकांना संपवलं परळीतल्या मी दहा नावं देतो, संगीत दिघोळे, किशोर फड, बापु आंधळे, मगदू मुंडे, पांडू गायकवाड अशा दहा लोकांना तुम्ही संपवलं. तुम्हाला पृथ्वीतलावांवरून संपवण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही खूप लोकांना मृत्यूमुखी पाडलंय, आज महादेव मुंडेचा सुद्धा तुमच्याच म्हणण्यावरून खुन झाला आहे, असं आमचं स्पष्ट आरोप नाही सगळे पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना संपवण्याच प्रश्नच नाही उलट त्यांनीच खूप लोकांना संपवलं आहे. यामध्ये एकच सांगतो “ जो बोएगा वो पाएगा” तुम्ही जे जे पापं केलेत त्याची तुम्हाला परत फेड येणार आहे.



संतोष देशुमख असतील महादेव मुंडे असतील यांचे खून कोणाच्या म्हणण्यावर झाले. धनंजय मुंडेच्या म्हणण्यावरच झाले सगळे पुरावे आहेत. तुमचे फोन कोणाला गेले, तुम्हाला कोणी फोन केलेत . त्यामुळे त्यांना कोणी संपवत नाही तर त्यांनी केलेल्या पापाची एक एक गोष्ट बाहेर येत आहे म्हणून त्यांना त्याचं दु:ख वाटतंय.


आजपर्यंत तपास यंत्रणा तुम्ही राजकिय दबावाखाली दाबून टाकल्या होत्या आता कुठंतरी तपास यंत्रणा कामाला लागल्या आणि त्यामध्ये तुमचा सहभाग समोर यायला लागला. महादेव मुंडे प्रकरणात विधानसभा तोंडावर असताना माझ्यासह इतर पाच लोकांना आरोपी करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा पोलिसांवर दबाव होता. कारण मी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातून उमेदवारी मागत होतो आणि माझी उमेदवारी निश्चित झाली होती. त्यामुळं यांना मला कुठंतरी यातून बाहेर ठेवायचं होतं असा आरोपही राजाभाऊ फड यांनी यांनी यावेळी केला.


..तर संतोष देशमुखांचा मर्डरही धनंजय मुंडेनीच घडवून आणल्याचं समोर यइल :

सतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची ब्रेन मॅपिंग केल्यास ह प्रकरणाही धनंजय मुंडे यांनीच घडवून आणल्याचं समोर यइल यात शंका नाही असा दावाही राजाभाऊ फड यांनी यावेळी केला.

Comments


bottom of page