top of page

माजीमंत्री धनंजय मुंडेंनी व्हि.राधा यांची फाईल गायब केली- दमानिया



ree

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा दकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.कृषी विभागातील कथित घोटाळाप्रकरणी दमानियांकडून सातत्याने मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता मुंडेंनी तत्कालीन कृषी सचिव व्ही. राधा यांची फाईलच गायब केल्याचा दावा करत दमानियांनी खळबळ उडवून दिली आहे.


अंजली दमानिया यांनी सोशल मिडियात याबाबत पोस्अ केली आहे. त्यांनी त्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने त्यंना गुरूवारी पाठवलेल्या एका पत्राचा संदर्भ दिला आहे. कक्ष अधिकारी रुचिता पिंगळे यांचे पत्र आहे. हे पत्रही दमानियांनी पोस्ट केले आहे.

दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले की, धनंजय मुंडेनी तत्कालीन कृषी सचिव व्ही. राधा यांची फाईल गायब केली आहे. व्हि. राधा या कृषी सचिव असताना कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौडबंगालाच्या रिपोर्टची फाईल मंत्र्यांना पाठवली. ही फाईल धनंजय मुंडे यांनी गायब केली.


आज लोकायुक्तांच्या सुनावणी दरम्यान मी हे लोकायुक्तांपुढे मांडल्यानंतर प्रतिभा पाटील नावाच्या उप सचिवांनी लोकायुक्तांना कन्फर्म केले, की ही फाईल मंत्र्यांना दिल्याचा जावक क्रमांक आहे, पण ही फाईल त्यांच्या कडून राजीनाम्यानंतर परत आली नाही. धनंजय मुंडे यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश लोकायुक्तांकडून देण्यात आले आहे. असा दावा दमानिया यांनी केला आहे.


दरम्यान, दमानिया यांनी पोस्ट केलेल्या पत्रानुसार, कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासाठी विशेष कृती योजनेअंतर्गत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे तत्कालीन प्र.स.(कृषी) यांनी तत्कालीन मंत्रभ (कृषी) यांच्याकडे जी नस्ती / अहवाल सादर केला आहे, त्याबाबतची नस्ती आपण दूरध्वनीद्वारे उपचिव (कृषी) यांच्याकडे मागणी केलेली आहे.


या बाबात आपणांस कळविण्यात येते की, ही नस्ती या कार्यासनाकडे कार्यवाहीसह / कार्यवाहीविना परत प्राप्त झालेली नाही. तसेच, ही नस्ती या कार्यासनास उपलब्ध करून देण्याबाबत तत्कालीन मंत्री यांच्या खासगी सचिवांना पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे. ही नस्ती उपलब्ध झाल्यानंतर आपणास त्याप्रमाणे कळविण्यात येईल, असे कक्ष अधिकार्‍यांनी पत्रात म्हटले आहे.

Comments


bottom of page