top of page

माणिकराव कोकाटेंची कृषिमंत्रिपदावरून हाकालपट्टी

क्रिडा खात्यावर वर्णी, दत्तात्रय भरणे नवे कृषिमंत्री




माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्र, त्यांना मंत्रिमंडळाबाहेर न काढता, खातेबदल करून क्रिडा व युवक कल्याण खात्याची जाबाबदारी देण्यात आली आहे. तर कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


गुरुवारी 31 (जूलै) रात्री उशीरा माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात आल्याची अधिसूचना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं जारी केली आहे. विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहातच ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर कोकाटे आणि राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार सुरू झाला होता. तसंच कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती.


राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे विधिमंडळात मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हिडीओ सर्वप्रथम सोशल मिडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. त्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकार आणि अजित पवार यांच्यावर दबाव वाढत चालला होता. मात्र, राजीनामा न घेता खातेबदल करून कोकाटेंना एकप्रकारे दिलासाच देण्यात आला आहे. लातूरमध्ये छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळी गोंधळ होऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी घाडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाणही केली होती. त्यानंतर तर कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी आणखीच जोर धरू लागली होती.


माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळण्यामुळे शेतकरी आणि जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली होती त्यामुळे विरोधकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. याच मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते उधळत आंदोलन केलं आणि “कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा नाजीनामा घ्यावा” अशी मागणी केली. यानंतर राष्टवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. या प्रकरणाचे पडसाद राज्यीर अनेक ठिकाणी उमटल्याचं पाहायला मिळालं. अशा प्रकारच्या मारहाणीबाबत उपमु÷ख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सुरज चव्हाण यांनी समाज माध्यमांद्वारे दिलगिरी व्यक्त करत माफीनामा जाहीर केला. तसंच, सुरज चव्हाण यांची युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टीही करण्यात आली होती.


इंदारपुरचे आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री असतील. दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रिडा व युवक कल्याण तसंच अल्पसंख्यांक मंत्रालयाची जबाबदारी होती. यातील क्रिडामंत्रिपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून ती जबाबदारी माणिकराव कोकाटेंकडे देण्यात आली आहे.

दरम्यान, दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेस पक्षाच्या हर्षवर्धन पाटील यांचाा पराभव करून दत्तात्रय भरणे पुण्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले आहेत. दत्तात्रय भरणे तिसर्‍यांदा विजयी झाले आहेत.

Comments


bottom of page