top of page

मालेगाव स्फोट प्रकरण; प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष, 17 वर्षानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल

ree

मालेगाव बॉम्बस्—फोट प्रकरणात आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व 7 आरोपींना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे.


मालेगावमध्ये स्फोट झाला हे सरकारी वकिलांनी सिद्ध केले, परंतु त्या मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाहीत. जखमींचे वय 101 नाही तर 95 वर्षे होते आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली होती. असा निष्कर्स न्यायालय काढत आहे; असं निकाल वाचताना एनआयए कोर्टाचे न्यायाधीश म्हणाले.


दरम्यान, 29 सप्टेंबर 2008 रोजी लोक रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. रात्री 9.35 वाजता मालेगावमधील भिखू चौकात बॉम्बस्फोट झाला. सर्वत्र धूर आणि लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. या स्फोटात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. 100 हून अधिक लोक जखमी झाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील निस्सार डेअरी समोरच हा स्फोट झाला होता.


Comments


bottom of page