top of page

मुंबई आंदोलनावरून जरांगे पाटील, लक्ष्मण हाके भिडले !

मराठ्यांच्या विरोधात ओबीसींना भडकवल्याचा जरांगे पाटलांचा आरोप;

जरांगेना आंतरवालीतच रोखा, सनासुदीच्या काळात 29 ऑगस्टला मुंबईत जाळपोळ करायची काय?- लक्ष्मण हाके



ree

मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई मोर्चाची हाक दिली आहे. नुकत्याच गोवा येथे संपन्न झालेल्या ओबीसींच्या अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठी लढण्याचा विश्वास दिला. त्यानंतर जरांगे पाटीलयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्याचबरोबर आता जरांगे पाटील यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी टीकेची झोड उठवली.


मराठा आरक्षण मागणीसाठी सरकारला अल्टीमेट देत तीन महिन्यात आरक्षण आंमलबजावणी करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, सरकार मागण्यांना बगल देत असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी मागील पंधरवाड्यापासून राज्यभर दौरे करून मुंबई आंदोलनासाठी मराठा समाजबांधवना अवाहन करत आहेत. याशिवाय मराठा बांधवांनी शिस्तीत मुंबई गाठायची, कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दखल आपणच घ्यायची आहे.


आंदोलकांमध्येच हजारो स्वयंसेवकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुंबई मोर्चासाठी गावबैठका त्याचबरोबर पारावरच्या बैठकांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांनी जनजागृती केली आहे. त्यातच गोवा येथे ओबीसी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठी लढणार असल्याचा दावा करत उपस्थितांना अस्वस्थ केले होते. त्यावर मराठा आंदोलनामध्ये दंगली घडविण्याचा कट रचल्याचा आरोप करत जंरागे पाटील यांनी मराठे कायम संविधानाच्या तत्वानुसार चालणारे अहिंसेचे पालक आहेत नेहमी प्रमाणे शांततेत आंदोलन करणार आहेत त्यामुळे काही प्रसंग उद्भवल्यास मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार राहतील असा इशारा देत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली.


जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लक्ष्मण हाके माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीखच अशी निवडली की, 29 ऑगस्ट या काळात मुंबईमध्ये मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो, ज्या जरांगेनी बीडमध्ये जाळपोळ केली तीच जाळपोळ त्याला सनासुदीच्या काळात मुंबईत करायची का? त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की या जरांगेला आंतरवालीतच रोखा, गुप्तचर विभागाकडून अहवाल घ्या आणि जरांगेला मुंबईत येण्या पासून रोखा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मंडल यात्रेवर टीका करताना हाके म्हणाले की, मंडल आयोग आणि शरद पवार यांचा दुरान्वये काही संबंध नसताना . मंडल आरक्षणाचे जनक असे यात्रेचे शिर्षक लावले आहे. शरद पवाराला पडलं दुरावलेला ओबीसी जवळ ओढायचा आणि जरांगे ला पडलंय बीड प्रमाणे मुंबईत जाळपोळ करायची. असेही हाके म्हणाले.

Comments


bottom of page