top of page

मुंबई तुडूंब: मिठीने ओलांडली धोक्याची पातळी, रस्त्यांवर ट्रॉफिक; वाहतूक सेवा ठप्प...



ree

मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असून पहाटेपासून देशाच्या आर्थिक राजधानीला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. सकाळपासून मुंबईत सूर्यदर्शनही झालं नाही. जोरदार पावसामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे. असं असतानाच आता मुंबईतून वाहणार्‍या सर्वात महत्वाच्या नद्यांपैकी एक मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.


भांडूप आणि विक्रोळीमध्ये दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

मिठी नदीतील पाणी पातळीने चार पूर्णांक सात मीटर इतका स्तर गाठला आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या वसाहतीमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे सतर्कतेचा इशरा दिला आहे.


ree

पावसामुळे लोकल ट्रेन्सबरोबरच रस्ते वाहतूक धीम्या गतीने होत आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या घाटकोप, विद्याविहार, कुर्ला,शीव, माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी भरल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला, टिळकनगर, गोवंडी स्थानकादरम्यान पाणी साचल्याने 20 ते 25 मिनिटे उशीराने लोकल धावत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम, माटुंबा रोड येथे पावसाचे पाणी साचल्याने लोक कासव गतीने ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ईस्टर्न फ्री वे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


चौपाट्या बंद

पावसाचा वाढता जोर लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबईच्या सर्व चौपाट्या पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. चौपाट्यांवर सामान्य लोकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील जुहू बीच, वर्सोवा बीच, अक्सा बीच, गोराई बीच हे सर्व ठिकाणे रिकामी करण्यात आली आहेत. मरीन ड्राइव्ह, वरळी सी फेस, वांद्रे कार्टर रोड, मध आयलंड यासारख्या समुद्रकिनार्‍यांवर लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उंच भरती आणि मुसळधार पावसाच्या धोक्यामुळे खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत.


ree

दरम्यान, मुंबईत आज 19 ऑगस्ट रोजी पहाटे 4:00 ते सकाळी 8:00 ( चार तास) सर्वाधिक फॉर्सबेरी जलाशय, एफ दक्षिण कार्यालय 109 मिमी, चिंचोली अग्निशमन केंद्र 107 मिमी, वार्सोवा उदचंदन केंद्र 106 मिमी, पर्जन्य जलवाहिन्या कार्यशाळा दादर 103, मुलुंड अग्निशमन केंद्र 100 मिमी. याशिवाय इतर त्याखालोखाल पावसाची नोंद झाली आहे.


काला रात्री पासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान खात्याने 19 ऑगस्टसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत असून, सूर्यदर्शनही झालेले नाही. सर्वत्र पूरजन्यस्थितीमुळे लोकल ट्रेनसह रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Commenti


bottom of page