मुंबई पोलिसांच्या चौकशीला जरांगे पाटील गैरहजर! वकिलांनी मांडली बाजू, तिघांचे जबाब नोंदवले
- Navnath Yewale
- Nov 11, 2025
- 2 min read

मुंबई: आझाद मैदानात झालेल्या मराठा आंदोलन प्रकरणातील गुन्ह्यात पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहा जणांना चौकशीसाठी हरज राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, तब्येत बरी नसल्याने मनोज जरांगे पाटील चौकशीला गैरहजर राहिले. त्यांच्या वतिने वकिलांनी बाजू मांडली. तर अन्य 3 जणांचे जबाब नोंदविण्यात आले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनेाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या काळात मुंबईत मोठ्या संख्येने मराठा बांधव आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हजारो कार्यकर्ते मुंबईत जमा झाले होते. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तसेच परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. घोषणाबाजी करत रस्ते अडवून, वाहतूक रोखून धरली होती.
त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासह आयोजकांविरोधात 3 सप्टेंबर 2025 रोजी आझाद मैदानात कलम 189(2),189(3),190,223(1)223(2),126(2),271 आणि 271 अन्वये, तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 37 (3, 38,135, 136 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने सोमवारी पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह 6 जणांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.
वकिलांनी बाजू मांडली: प्रकृती अस्वस्थामुळे मनोज जरांगे पाटील चौकशीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतिने अॅड. आशिषराजे गायकवाड यांनी बाजू मांडली. जरांगे पाटील यांच्यावरील आरोपी अमान्य असल्याचे त्यांनी सांगितले. या गुन्ह्यात जरांगे पाटील यांना सहआरोपी करण्यात आले आहे.
त्यांच्यावरील आरोपांचे वकिलाने खंडन केले. 21 सप्टेंबर रोजी मराठी बांधव मुंबई नव्हता. आंदोलन होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन काळात गैरसोय झाल्यामुळे गुन्हे ादाखल करण्यात आले असतील, मात्र मी जरांगे पाटील यांची आंदोलनामागील भूमिका पोलिसांना समजावून सांगितली आहे, असेही ते म्हणाले. जरांगे पाटील आणि आंदोलनाचे नेते संविधानाला मानणारे आहेत आणि त्यानुसारच आंदोलन सुरू होते, असा दावा त्यांनी केला.
तिघांचे जबाब नोंदवले : आझाद मैदान पोलिसांनी सोमवारी प्रशांत सावंत, वीरेंद्र पवार आणि चंद्रकांत भोसले यांचे जबाब नोंदवले. शासनाने गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील अध्यादेश काढला आहे. त्याची माहिती त्यांनी दिली. कुठलेही कृत्य बेकायदेशीर केले नसल्याचा दावा तिघांनी केला.
पांडुरंग तारक आणि सीताराम गंगाधर काळकुटे यांच्या वतीने दोन वकिलांनी आंदोलनासंबंधी लेखी माहिती सादर केली. या लेखी निवेदनामध्ये आंदोलनादरम्यान काय घडले?, आंदोलन का करण्यात आले? आणि त्या मागचा हेतु काय होता? यासंदर्भात माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.



Comments