मुंबईच्या महापौरपदी भाजप कोणाला संधी देणार! 40 वर्षानंतर भाजपला सत्तास्थापनेचा योग,चर्चेतील नावांचा बोलबाला
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका, मुंबई देशाच्या आर्थिक अणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचं शहर मानलं जातं. याच मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व कायम टिकवण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. मुंबई आणि शिवसेना हे समीकरण प्रत्येकवेळी होणार्या महानगरपालिकोच्या निवडणुकीत कायम पाहायला मिळते. मात्र हेच समीकरण यंदा बदलताना दिसलं. शिवसेनेची मुंबई आणि मुंबई शिवसेनेची म्हणता म्हणता आता याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचं वर्चस्व निर्माण होताना दिसत आहे. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाने जोरदार बाजी मारली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यंदा एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपचं पारडें जड झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार. याकडे सार्यांचं लक्ष लागलं आहे. या महापौरपदावर मराठी माणूस बसला पाहिजे, अशी आक्रमक मागणी विरोधकांकडून केली जात आहे. 40 वर्षाच्या काळानंतर आता मुंबईच्या महापौरपदावर भाजपकडून कोणाला संधी मिळणार, याकडे सार्यांचं लक्ष लागलं आहे.
प्रभाकर शिंदे: मुंबईतील भाजपचे प्रभाकर शिंदे यांचं नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे. मुलूंड पूर्व परिसर हा प्रभाकर शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक बाबींचा सखोल अभ्यास आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांनी पालिकेतील प्रशाकीय यंत्रणा आणि अर्थसंकल्पासाठी योगदान दिलं आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात जनतेशी बांधिलकी जपणारे आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या शिंदे यांचं नाव चर्चेत आहे.
तेजस्वी घोसाळकर : महापौरपदाच्या महिला राखीव गटातनि तेजस्वी घोसाळकर यांचं नाव देखील आघाडीवर आहे. त्यांनी दहिसर प्रभागातून विजय खेचून आणला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव केला. एखाद्या महिलेची महापौरपदी नियुक्ती केल्यानंतर भाजपची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रकाश दरेकर: प्रकाश दरेकर यांचंही दहिसर भागात वर्चस्व आहे. भाजपच्या प्रकाश दरेकर यांनी यंदाच्या निवडणुकीत मताधिक्याने विजय मिळवला आहे. दरेकर हे आवश्यक सोयी सुविधांसाठी कायमच तत्पर असतात, असं बोललं जातं. त्यामुळे त्यांचही नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे.त्यांच्यासोबत मकरंद नार्वेकर आणि राजश्री शिवलकर यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे.



Comments