top of page

मुंबईत महायुतीत अंतर्गत गटबाजी उफळली, भाजपच्या पडलेल्या उमेदवारांचा शिंदे सेनेवर ठपका

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीने घवघवीत यश मिळवत सत्ता यश मिळाले असले तरी एकहाती सत्ता मात्र मिळू शकली नाही. अशातच आता मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील धुसफस उघड होऊ लागली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप भाजपच्याच काही नेत्यांकडून होत आहे.


मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली असली, तरीविजयाचा हा गुलाल भाजपच्या काही माजी नगरसेवकांच्या डोळ्यात झोंबणारा ठरला आहे. विजयाची खात्री असलेल्या तब्बल 11 प्रभागांमध्ये भाजपला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला असून, या पराभवाचे खापर आता अंतर्गत गटबाजीवर फोडले जात आहे.


विशेष: शिंदे गटाने काही ठिकाणी छुपी मदत केल्याची चर्चा आता भाजपच्या गोटात सुरू झाली असून, यामुळे महायुतीतील धुसफूस उघड झाली आहे. मुंबई महापालिकेत स्वबळावर सत्तेचा आकडा गाठण्याचे भाजपचे स्वप्न काही जागांनी अधुरे राहिलेश. निवडणुकीत 11 जागांवर भाजपच्या उमेदवारांना आगदी थोडक्यात पराभव पत्कारावा लागला. अश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या प्रभागांमध्ये महायुतीची मते सहजपणे ट्रान्सफर होणे अपेक्षित होते, तिथेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तटस्थ भूमिका घेतली किंवा थेट विरोधी काम केल्याचा अरोप भाजपचे काही माजी नगरसेवक करत आहेत.


दरम्यान,भाजपच्या पदाधिकार्‍यांनी शिंदे सेनेवर नाराजी व्यक्त करत “ आम्ही युतीधर्म पाळला, पण मित्रपक्षाने मात्र दगा दिला ” अशी भावना पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. या अंतर्गत कलहाचा सर्वाधिक फायदा काँग्रेस पक्षाला झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने मुंबईत 24 जागांवर विजय मिळवून सर्वांना चकित केले. भाजपच्या हक्काच्या मानल्या जाणार्‍या प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


शिंदेच्या शिवसेनेने भाजपला साथ न देता पडद्यामागून काँग्रेसला मदत केल्यामुळेच काँग्रेसची ताकद वाढल्याची चर्चा आता भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये रंगली आहे. आगामी काळात महायुतीमध्ये मुंबईच्या सत्तेवरून मोठा संघर्ष पाहायाला मिळण्याची शक्यता आहे.

Comments


bottom of page