मुंबईला येतोय, मला गोळ्या घाला !
- Navnath Yewale
- Aug 27
- 2 min read
हजारो वाहनांच्या ताफ्यासह जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

मराठा आदोलक मनोज जरांगे पाटील यांना मा. उच्च न्यायालयाने परवानगी शिवाय आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नसल्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलनावर ठाम असून आज सकाळी 10:30 जरांगे पाटील यांनी हजारो वाहनांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने कूच केली आहे.
मुंबईत गणेशोत्सवामुळे गर्दी, वाहतूकीची समस्या याअनेक गोष्टींमुळे जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी देऊ अशी याचिका श्री मिश्रा यांनी केली होती. मिश्रा यांच्या सुनावणि दरम्यान मा.उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना परवानगी शिवाय आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही असे निर्देश दिले आहेत.
न्याय देवतेचा आम्ही आदर करतो, हे सगळं सरकारचं षडयंत्र आहे. न्यायदेवता आम्हालाही न्याय देणार आहे. संविधानाने आम्हालाही हक्क दिले आहेत. त्या हक्काची आम्ही मागणी करत आहोत. त्यामुळे संविधानिक हक्कानुसार आम्हालाही न्याय मिळेल. सरकारची बाजू जशी ऐकून घेतली तशी आमचीही बाजू न्यायदेवता ऐकून घेईल. लोशाही मार्गाने आम्ही शांततेत मुंबईला जात आहोत. न्यायदेवतेचा आदर, सन्मान करून कायद्याच्या चौकटीतच आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचे म्हणत जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10:30 वाजता मुंबईच्य दिशेने रवाना झाले आहेत.
जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील समाजबांधवांना मुंबईकडे रवाना होण्यासाठी आंतरवालीकडे येण्याचे अवाहन केले होते. त्यानुसार हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव,बीड, जालना, छत्रपती संभाजीगनर जिल्ह्यातील समाजबांधव मंगळवारी (दि.26)ऑगस्ट सायंकाळपासूनच आंतरवाली सराटी येथे वाहनांसह दाखल झाले. मध्यरात्री पासूनच आंतरवाली पासून तीन किलोमिटर असलेल्या धुळे- सोलापूर महार्गा जाम झाला होता. वडीगोद्री ते शहागड पर्यंत वाहनांच्या रांगा लगल्या.
जरांगे पाटील यांनी बुधवारी (दि.27) ऑगस्ट सकाळी आंतरवाली सराटी (जि.जालना) येथील विविध मंदीरांमधील विविध देवी-देवतांचे दर्शन घेवून आंतरवाली-वडीगोद्री-पैठण फाट्यावर दाखल झाले. तत्पूर्वी आंतरवाली महिला ग्रामस्थांसह स्व.संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने जरांगे पाटील यांचे औक्षण केले. त्यानंतर हजारो नागरीकांसह शेकडो वाहनांच्या ताफ्यासह जरांगे पाटील वडीगोद्री- पैठण फाटा (शहागड) येथे दाखल झाले. जरांगे पाटील यांना आंतरवाली सराटी ते पैठण फाटा या 10 कि.मी.च्या अतरातच तीन तासाचा कालावधी लागला.
दरम्यान, पैठण फाटा, पिंपळगांव (साष्ठा )-हिरडपूरी- पैठण- घोटण-शेवगाव- पांढरीपूल- आहिल्यानगर- आळेफाटा- शिवनेरी (जून्नर) येथे मुक्काम राजगुरुनगर- खेड- चाकण- तळेगाव- लोणावळा- पनवेल- वाशी- चेंबूर मार्गे शुक्रवारी (दि.29) ऑगस्ट आझाद मैदान असा रुट आहे.
Comments