top of page

मुखेडच्या पुरग्रस्त भागामध्ये डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांच्या मार्गदर्शनामध्ये वैद्यकिय चिकित्सा व लंगर पथक रवाना

ree

गत दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये खुप पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच अनुषंगाने मुखेड मध्ये अतिवृष्टी मुळे येथे पूर आला त्यामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तसेच येथे पिकांचेव घरांचे आतोनातनुकसान झाले आहे.या पुरामध्ये विस्कळीतझालेल्या कुटुंबियांसाठी गुरुद्वारा बोर्डाचे माननिय प्रशासक डॉ. विजय सतवीर सिंघ जी यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम मुखेडला रवाना करण्यात आली.


या टीम मध्ये मेडीकल स्टॉफ, लंगर स्टॉफ ला पाठविण्यात आले आहे. जेणे करुन गरजूंना वैद्यकिय सुविधा व खाण्या-पिण्याची सोय उपलब्ध होईल. मेडीकल टीमचे नेतृत्व डॉ. रातोळीकर सर, व लंगर सेवा पथकाचे नेतृत्व स.. धुन्ने यांनी केले तसेच त्यांच्या साह्यतेसाठी इतर स्टाफ सोवत आहे.


ree

या टीमला रवाना करण्यापूर्वी तख्त सचखंड श्री हजुर अबिचलनगर साहिब चे मुख्य पुजारी जत्थेदार - संत बाबा कुलवंत सिंघ जी यांच्या हस्ते अरदास करुन या टीमला पाठविण्यात आले. या अरदास वेळी गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक स. गुरुबचन सिंघ शिलेदार, वरिष्ठ सहा. अधिक्षक स. हरजीत सिंघ कडेवाले, सहा. अधिक्षक स. रविंद्र सिंघ कपुर, सहा. अधिक्षक स. जैमल सिंघ ढिल्लो, सहा. अधिक्षक स. बलविंदर सिंघ फौजी, इतर कर्मचारी व मदत कार्यासाठी जाणारी सर्व टीम उपस्थित होती.

Comments


bottom of page