मुख्यमंत्री फडणवीस यांना माझ्यावर हल्ला करायचाय - जरांगे पाटील
- Navnath Yewale
- Aug 13
- 2 min read

परभणी: गोवा येथील ओबीसी अधिवेशनामध्ये मराठा आंदोलनामध्ये दंगल भडकवण्याचा कट शिजला आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांना माझ्यावर हल्ला करायचा असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी राज्यभरातील मराठा बांधवांसोबत मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर जिल्हानिहाय तयारीचा आढावा घेत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ते करत आहेत. गोवा येथील ओबीसी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठी लढणार, जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा कायदा सुव्यवस्थेचा विषय असल्याने पोलिस पाहून घेतील असे वक्तव्य केल्याने जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत देशभरात गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यामुळे राज्याच्या राजधानीत गणेश भक्तांची मोठी गर्दी होणार असल्याने उत्सव काळात वाहतुक कोंडी यासह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याची खबरदारी म्हणून जरांगे पाटलांना रोखण्याच्या मागणीला जरांगे पाटील यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. आम्हाला यंदा आमचा गणपती मुंबईच्या समुद्रात वित्सर्जीत करायचा आहे. मुंबई आमची आणि आम्ही मुंबईचे आहोत, त्यासाठी आम्ही आमच्या वाहणांवर गणपतींची स्थापना करणार आहोत असंही जरांगे पाटील म्हणाले.
नुकतच गोवा येथे ओबीसी अधिवेशन संपन्न झाले यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना अस्वाशित करताना ओबीसींसाठी लढणार असल्याचे म्हटले. त्यानंतर पत्रकारांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे, त्यामुळे पोलिस काय ते पाहतील’
त्यानंतर भाजप आमदार परिणय फुके यांनी कालच जरांगे पाटलांवर जहरी टीका करत जसं पावसाळ्यात बेडूक बाहेर येतात तसं जरांगे पाटील निवडणुका आल्या की बाहेर पडतात. जरांगे पाटलांना मराठ्यांना न्याय द्यायचा की नाही, हे अगोदार त्यांनी ठरवावं. मागील वर्षभरातपासून जरांगे पाटील यांच वक्तक्य पाहता त्यांना मराठा समाजास आरक्षण मिळवून देण्याची भूमिका वाटत नसल्याचे परिणय फुके म्हणाले. लक्ष्मण हाके यांनीही जरांगे पाटलांवर टीकेची झोड उठवत सनासुदीच्या काळात जरांगे पाटलांना मुंबईत जाळपोळ करायची काय ? असा सावाल उपस्थित करत जरांगे पाटील यांना आंतरवालीतच रोखण्याची मागणी केली.
या सगळ्या घडामोडीनंतर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे. ओबीसी अधिवेशनामध्ये मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट शिजला आहे. यामागचा सुत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवळचे काही लोक आंदोलनाच्या विरोधात बोलण्यासाठी सोडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर हल्ला करायचा आहे. पण लक्षात ठेवा माझ्या केसालाही धक्का लागला तर तुमचं राजकिय अस्तित्व नष्ठ होइल. आंदोलनातील एखाद्या पोराला जरी धक्का लागला तर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाहीत असा इशाराही जरांगे पाटील यांनी परभणी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.



Comments