top of page

मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगे पाटलांच्या भेटीला; आता चर्चा आझाद मैदानावरच, जरांगे पाटील आंदोलनावर ठाम!


ree

मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. बुधवारी (दि.27) अंतरवाली सराटी येथून लाखो समाज बांधवांसोबत ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मुंबईत गणपती उत्सवामुळे जरांगे पाटील यांच्या आदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू यासाठी सरकारकडून जरांगे पाटील यांचे आंदोलन पुढे ढकण्यात यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील समाज बांधव आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, आंतरवाली सराटीकडे येणार्‍या बांधवांच्या मुक्कामाची जागोजाग मंगल कार्यालय, फंक्शन हॉलमध्ये करणत आली आहे. त्यानुसार आज सायंकाळी उपस्थितांशी संवाद साधून जरांगे पाटील गुरुवारी (दि.27) सकाळी 10:00 वाजता आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.


सध्या गणेशोत्सव सुरू होत आहे, मुंबईत गणेशोत्सवामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून सरकारकडून जरांगे पाटील यांचे आंदोलन पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जरांगे पाटील यांच्याशी चर्चेद्वारे मार्ग काढण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी सकाळी आंतरवाली येथे जरांगे पाटलांची भेट घेतली.


जरांगे पाटील यांच्याशी चर्चेनंतर साबळे यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, मी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मार्गावर काही अडचणींची माहिती घेण्यासाठी आलो आहे. जरांगे पाटील यांचा मोर्चा ज्या मार्गाने मुंबईकडे रवाना होणार आहे त्या मार्गावर काही आंदोलनकर्त्यांना समस्या निर्माण होवू नये याची खबरदारी म्हणून उपाय योजनांबाबत जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.


जरांगे पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच राजेंद्र साबळे यांच्याशी चर्चा केली. पाटील म्हणाले की, मु÷ख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही दिड वर्षे वेळ दिला आहे. आम्हला मुंबईला येण्याची हौस नाही हे आम्ही गेल्या चार महिन्या पासून सांगत आहोत. आमच्या मागण्यांची तात्काळ आंमलबजावणी करा, आम्ही नाही येत मुंबईला.


आता चर्चा फिर्चा जे काही होईल ते आझाद मैदानावरच होईल, राज्यभरातील लाखो मराठे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आंतरवाली सराटी येथे रात्रीपासूनच मराठे दाखल होत आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने शांततेत मुंबईला येत आहेत आमच्यासाठी एक मार्ग द्यावा आम्ही मुंबईकरांना त्रास देणार नाहीत. मुंबईकरही आमच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. असेही जरांगे पाटील म्हणाले.

Comments


bottom of page