top of page

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डॉ. योगेश क्षिरसागरांचा भाजपात प्रवेश


छ.संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच 2012 च्या बीड नगरपालिका निवडणुकीत शुन्य आणि 2017 च्या निवडणुकीत 50 पैकी एक जागा जिंकणार्‍या भाजपला त्यावेळेसच्या निवडणुकीत दुर ठेवूनच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये तयारी सुरु केली होती. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा नारा देण्याशिवाय पक्षासमोर पर्याय नव्हता. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाने दिलेल्या स्वबळाच्या नार्‍याला ताकद मिळणार हे निश्चित मानले जात आहे.


जिल्ह्यातील सहा नगरपालिकांपैकी किल्ले धारुर, माजलगाव व गेवराईत भाजपने स्वतंत्र लढण्याची पूर्णपणे तयारी करून ताकदही जमविलेली आहे. अंबाजोगाईत मात्र पक्षाचेच नेते चिन्हाऐवजी आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. परळीत राष्ट्रवादी-भाजप युतीबाबत बोलणी सुरु आहे. बीडमध्ये मात्र भाजप पक्ष एकटा आणि नेहमीप्रमाणे दुबळा होता. 2012 निवडणुकीत शुन्य आणि मागच्या वेळी एक नगरसेवकपद जिंकणार्‍या भाजपला 50 उमेदवारही उभा करता आले नव्हते.

दरम्यान, आगामी काळात होत असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, शहराध्यक्ष अशोक लोढा यांनी बुथ कमिट्यांच्या माध्यमातून बांधणी केली होती. संघटन काही प्रमाणात वाढलेले असले तरी पक्षाकडे नगरपालिकेचे 52 नगरसेवक पदाच्या उमेदवारांची वानवा होती.


या काळात मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी डॉ.क्षीरसागरांच्या भेटी वाढल्याने सुरुवातीला डॉ. क्षीरसागर व भाजप यांच्यात आघाडीची शक्यता मानली जात होती. मात्र, त्यांनी शेवटच्या टप्प्यात राजीनामा देत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.


क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काळात भाजपला बीडमध्ये चांगला चेहरा आणि बळ मिळण्याची शक्यता मानली जात आहे. पक्षाचे काही व डॉ. क्षीरसागरांचे अशी गोळाबेरीज करुन पक्ष सर्व जागा लढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता बीड शहरात भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.


बीडच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे, विशेषत: बीड शहर आणि आसपाच्या भागामध्ये डॉ.योगेश क्षीरसागरांच्या प्रवेशामुळे भाजपला या भागात विशिष्ट मताधार जोडण्यास मदत होणार आहे. यावेळी बीडमध्ये भाजप नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या सर्व 52 जागा ताकदीने लढविणार आहोत. पुर्वीसारखे चित्र या निवडणुकीत निश्चित नसणार आहे, असे बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख म्हणाले.

Comments


bottom of page