मोखाडा पंचायत समितीवर कमळ फुलवणार !
- Navnath Yewale
- Aug 23
- 1 min read
तालुक्यात भाजपला पोषक वातावरण; प्रकाश निकम यांची पत्रकार परिषदेत माहिती

मोखाडा : आजवर मोखाडा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.पवार गट) आणि शिवसेना यांनी आलटून पालटून सत्ता मिळवली आहे.एवढेच काय तर आजवर भाजपाचा सभापती पंचायत समिती वर आजवर झालेला नाही मात्र आता शिवसेनेचे मोखाडा तालुक्यातील मा.जि.प.अध्यक्ष प्रकाश निकम यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्या नंतर मित्र पक्ष शिवसेनेला डिवचले असून आता होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदा मोखाडा पंचायत समिती वर कमळ फुलवणार असल्याची घोषणा केली असून प्रवेशानंतर त्यांनी मोखाडा येथे पत्रकार परिषद घेतली यामध्ये हे आव्हान त्यांनी दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे माझा आणि कही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश मुंबई येथे झाला असला तरी अजून मोठ्या प्रमाणावर प्रवेश स्थानिक पातळीवर होणार असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला असून त्यांच्या या विधानामुळे मोखाडा शिवसेनेमध्ये आता अजून मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मी कुपोषण बालमृत्यू विविध समस्या सोडवण्यासाठी मोठे प्रयत्न केले.शिवसेने मध्ये फूट पडल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलो शिंदे यांनी तसेच शिवसेनेनेनी मला भरपूर दिले.संविधानिक पदावर बसवलं मात्र संघटनात्मक पातळीवर मला बिलकुल विश्वासात घेतले जात नव्हते.मला जिल्हा प्रमुखां कडून फोन येत नव्हते. माझी भाषणे कापली जात होती.यामुळे मी नाराज होतो त्याच बरोबर मला आमदारकीची महत्वाकांक्षा होतेच अशावेळी मला शिंदे यांनी ठरवलं असत तर माझ्यासाठी जागा मागून घेतली असती किंवा भाजपच्या तिकिटावर लढवून निवडून आणले असते मात्र माझ्याबाबत त्यांचे कान भरवण्यात आले मला ती संधी मिळाली नाही म्हणून नाराज होऊन बंडखोरी देखील केली.मी विधानसभा लढवताना जिजाऊ पक्षात गेलो त्यांच्याकडून लढलो मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी माझा विश्वासघात करून धोका दिला यानंतर माझ निलंबन मागे घेणे आवश्यक होते मात्र असे न होता मला ज्यानी धोका दिला त्यांनाच पक्षात घेऊन उपनेतेपद दिले यांमुळे अशा लोकांच्या नेतृत्वात काम करणे मला अजिबात शक्य नव्हते.
अशावेळी मला भाजप पक्ष जवळचा वाटतो असे त्यांनी सांगितले यावेळी तुमच्या प्रवेशामुळे भाजपामध्ये गट तट निर्माण होतील का असे विचारले असता यावर निकम यांनी माझ्या येण्याने कोणताही गट तट निर्माण होणार नाहीत.काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष हा भाजप आहे.यामुळे या पक्षात कोणतेही गट नव्हते आणि यापुढेही नसणार अशी ग्वाही देखील प्रकाश निकम यांनी यावेळी दिली.



Comments