मोठी कारवाई! बीड सायबर विभागातील वादग्रस्त पीएसआय रंजीत कासले पोलिस खात्यातून बडतर्फ

बीड येथील सायबर पोलिस ठाण्यातील वादग्रस्त निलंबीत पोलिस उपनिरिक्षक रंजीत कासले यांच्या वर अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल होता.तो गुरुवारी रात्री उशीरा पोलिसांना शरण येणार होता. परंतु तसे न करता तो एका लॉजवर जाऊन झोपला असता आज सकाळी बीड पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पंरतु त्या आधिच गुरुवारी रात्री छत्रपती संंभाजीनगरचे विशेष पोलिस महानिक्षक विरेंद्र मिश्र यांनी कासले यांस पोलिस खात्यातून बडतर्फ चे आदेश काढले.
अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर यांनी ही माहिती दिली. रंजीत कासले हा सायबर पोलिस ठाण्यात असताना विना परवागी आरोपीला घेवून गुजरातमध्ये गेला होता. तिथे त्याने पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने 26 मार्च रोजी त्याला निलंबीत केले होते. त्यानंतर कासले यांनी अनेक व्हिडीओ व्हायरल केले होते. यातील एकामध्ये त्याने एका समाजाबाबत अक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणी बीडमधील एका वकिलाच्या फिर्यादीवरुन 14 एप्रील रोजी शिवाजीगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
त्यानंतर पोलिस त्याच्या मागावर होते. परंतु तो सापडत नव्हता, उलट त्यांने महाराष्ट्र पोेलिसांना हिंमत असेल तर पकडून दाखवा असे आव्हान दिले होते. परंतु गुरुवारी रात्री तो पुण्यात आला विमानतळावरच त्याने माध्यमांशी संवाद साधला या वेळी त्याने पुन्हा एकदा सरकार आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यावर आरोप केले. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरही सडकून टिका केली.
गुरुवारी सकाळी कासले यांनी सोशल मिडीयावरुन काही रिल्स व्हायरल केल्या यात त्याने ‘गब्बर इज बॅक’ असे लिहून चार चाकी वाहनाची स्पीड 157 पर्यंत असल्याचे दाखवले याच वाहनात त्याने आपली पोलिसची टोपीही समोर ठेवल्याचे दिसत आहे. निलंबना नंतरही तो इतरांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता.
अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कासलेच्या मागावर होते. परंतु त्यांनाही तो सापडला नाही वेगवेगळे ठिकाण सांगून त्यांने बीड पोलिसांना चांगलेच गुंगावले गुरुवारी ही तो शरण येणार असे सांगितले होते, परंतु त्याने पुन्हा एकदा चकवा दिला. मात्र बीड पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका लॉजमधून कासले यास ताब्यात घेतले.



Comments