top of page

पाटोदा बसस्थानकातील सोन्याचे दागिने, रोख रकम चोरीचा छडा लागलाआरोपी महिलेकडून 13.97 लाखांचा मुद्देमाल जप्त

12 minutes ago
2 min read

बीड: बसस्थानकात गर्दीचा फायदा घेवून बसमध्ये चढताना हातसफाईने महिलांचे दागिणे, रोखरक्कम चोरीचे प्रकार जिल्ह्यात वाढत आहेत. पाटोदा बसस्थानक परिसरात बॅगेतून लाखोंचे सोने व रोख रक्कम चोरीला गेले होते. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिसांत अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आल. स्थानिक गुन्हे शाखा व पाटोदा पोलिसांनी घटनेच्या तपासामध्ये तांत्रिक पुरव्याअधारे चुंभळी फाटा येथून एका महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरीस गेलेले 8 तोळे 4 ग्रॅम सोन्याचे दागिने 10 हजार रुपये रोख असा एकूण 13 लाख 97 हजार 160 रुपयांचा मुद्देमाला जप्त करण्यात आला.


शासनाच्या महिलांना प्रवासी सवलतीमुळे एसटी प्रशामध्ये सहाजिकच महिलांची प्रवाशांची संख्या अधिक आहे. बसस्थान, एसटीबसमध्ये अथवा बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेवून सोन्याच्या दागिण्यांसह रोख रकम चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तपास यंत्रणांना केवळ बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा एकमेव तांत्रिक आधार असला तरी एसटीप्रवासात, गर्दीचाव फायदा घेवून बसमध्ये चढताना अशा घटना घडत आहेत.


बीडच्या पाटोदा बसस्थानक परिसरात पीडित महिलेच्या बॅगमधून 8 तोळे 4 ग्रॅम सोन्याचे दागिने, 10 हजार रुपये रोख रक्कमेच्या चोरी प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात 0261 / 2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.


घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना गोपनिय बातमीदारामार्फत चोरीच्या गुन्ह्यातील महिला आरोपी सोजर सुरेश भोसले (वय 45, राहणार पारनेर, ता. पाटोदा) ही चोरीचे सोने विक्री करण्याच्या उद्देशाने चुंबळी फाटा येथे थांबली असल्याची माहिती मिळाली.


मिळालेल्या माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेच्यवा पथकाने पंचासमक्ष चुंबळी फाटा येथे कारवाई केली. यावेळी महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिच्याकडून 4 तोळे 4 ग्रॅम सोन्याची दागिने आणि 10 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले.


दरम्यान, तपासात उर्वरित चोरीचा मुद्देमालही हस्तगत झाल्याने या गुन्ह्यातील 8 तोळे 4 ग्रॅम सोने आणि रोख 10 हजार रुपये असा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. या कारवाईमुळे पाटोदा बसस्थानकातील चोर्‍याच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे.


स्थानिक गुन्हे शाखा व पाटोदा पोलिसांच्या या कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. प्रवासा दरम्यान महिलांनी आपली दागिने, रोख रकमेसह मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. गर्दीत वावरताना आजूबाजूस आनोळखी व्यक्ती धक्का देते असेल अथवा काही संशयास्पद हालचाल करत असेल, सावध पवित्रा घ्याव बसमधून प्रवासा दरम्यान शेजारील अनोळखी व्यक्तीच्या हालचालीवर बारकारईने लक्ष द्यावे काही अनुचित प्रकाराची जानिव होताच पोलिसांशी हेल्पलाईनवरून संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिस अधिकार्‍यांनी केले आहे.


पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांच्या आदेशान्वये अपर पोलिस अधिक्षक समीर शेख, आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

पालिस उपनिरिक्षक शेखर औटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकामध्ये पोलिस हवालदार सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, बाळासाहेब सानप, आनंद मस्के, महिला कर्मचारी स्वाती मुंढे, चंद्रकला नागरगोजे, पोलिस आमंलदार अशफाक सय्यद, मनोज परजणे, अश्विनकुमार सुरवसे, चालक पोलिस आंमलदार सिद्धार्थ मांजरे यांचा सहभाग होता.

Comments


bottom of page