top of page

मोबाईल झुडपात फेकला, भिंतीवरून उडी मारली.. ईडीकडून छाप्यादरम्यान टिएमसी आमदाराला अटक!

ree

ईडीने सोमवारी बंगालमधील शिक्षक आणि कर्मचार्‍यांच्या भरतीतील अनियमिततेच्या चौकशी संदर्भात राज्यातील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बुरवान विधानसभा मतदारसंघातून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवनकृष्ण साहा यांना अटक केली आहे. यापूर्वीही ईडीच्या पथकाने टिएमसी आमदार आणि त्यांच्या काही नातेवाईकांच्या ठिकाणांवर छापे टाकले. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, छाप्यादरम्यान अधिकार्‍यांनी अनेक महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.


ईडी अधिकार्‍यांच्या छाप्यानंतर साहाने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा फोन झुडपात फेकून दिला. ईडीच्या अधिकार्‍यांनी त्यांना पळून जाण्यापूसन रोखले आणि त्यांचा मोबाईल फोनही जप्त केला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आमदाराला कोलकाता येथे आणण्यात आले. 2023 मध्येही, सीबीआय अधिकार्‍यांनी त्यांच्या घरी छापा टाकल्यांनतर, तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे दोन मोबाईल फोन तलावात फेकून दिले. ईडीच्या पथकाने या दिवशी कोलकतासह मुर्शिदाबाद, बीरभूम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील अंडी येथील त्यांच्या निवास्थानी साहाविरुद्घ छापा टाकण्यात आला. केंद्रीय दलाचे कर्मचारीही ईडीच्या पथकासोबत होते.


जिल्ह्यातील रघुुनाथगंज येथील पियारापूर येथील तृणमूल काँग्रेसच्या आमदाराच्या सासर्‍यांच्या घरीही तपास अधिकार्‍यांनी शोध मोहिम राबवली. याशिवाय बीरभूम च्या सैंथिया येथील जीवनकृष्ण साहाच्या काकू आणि टिएमसीच्या नगरसेवक माया साहाच्या निवास्थानीही छोप टाकण्यात आले. त्याच वेळी मुर्शिदाबादमधील महिषग्राम येथील बँग कर्मचारी रोजश घोष यांच्या निवास्थानीही छापे टाकण्यात आले.


2023 मध्ये साहा यांना या घोटाळ्यात सहभागी असल्याबद्दल सीबीआयने अटक केली होती आणि नंतर त्यांची सुटका झाली. ईडीचा मनी लाँड्रिंगचा खटला सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमधून उद्भवतो, ज्यामध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने गट क आणि ड कर्मचारी इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे सहाय्यक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांच्या भारतीतील कथित अनियमिततांची चौकशी करण्योच निर्देश दिले होते.

Comments


bottom of page