मोहोळ बसस्थानकाजवळ रातोरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला, पोलिसांचा कडक बंदोबस्त; शहरपरिसरात तणाव
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 1 min read

सोलापूर: मोहोळ शहरातील बसस्थानकासमोर पंढरपुर रोडवरील राष्ट्रीय महामार्गाच्या आरक्षित जागेवर शंभुप्रेमींनी रातोरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. महामार्गाच्या आरक्षीत जागेवर अचानक रात्रीतून पुतळा बसवण्यात आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्याल आला आहे.
मोहोळ शरालतील पंढरपूर रोडवर बसबस्थानक परिससरात माहामार्गाची जागा राखिव ठेवण्यात आली होती. या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. येथेच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा स्थापनेची मागणी शंभुप्रेमींची होती. मात्र प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने शंभुप्रेमींनी रविवारी (दि. 22) पहाटे अचानक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. दरम्यान, सबंधीत जागा महामार्ग प्रकल्पासाठी आरक्षित असल्याचे सांगण्यात येत असून याबाबत प्रशासनाकडून परनवागी घेण्यात आली नसल्याचे बोललउभाला.
मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास शंभुप्रेमींनी राष्ट्रीय महामार्गालगतच्या जागेवर अचानक पुतळा उभारला. सबंधीत जागा महामार्ग प्रकल्पासाठी आरक्षित असून यासाठी परवानगी घेण्यात आली आहे का? या बाबत प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासून परसिरात मोठ्या संख्येने नागरिक, शंभुप्रेमींनी गर्दी केली होती. “छत्रपती संभाजी महाराज की जय”अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. परिस्थितीवर नियंत्र मिळविण्यासाठी सोलापूर पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात केली आहे.
सद्यास्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्कता बाळगण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकार्यांकडूनही संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यात आला आहे.
बाजीराव पवार
पोलिस निरिक्षक, मोहोळ पोलिस ठाणे



Comments