... या बीड जिल्हाकारगृह जेवनासाठी चांगल आहे.भाजप आमदार असं का म्हणाले

संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर बीड जिल्ह्याची गुन्हेगारी, टोळी, माफिया राज अशी राज्यात ओळख होत आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरवाती पासून लावून धरणारे भाजप आमदार मागील काही दिवसापासून या प्रकरणी माध्यमांपासून दूर दिसले. पण आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी थेट जिल्हा प्रशासनावरच हल्लाबोल केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र हळहळला, हत्या प्रकरणातील एकून आरोपी पैकी सात आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असून सध्या बीड कारागृहात आहेत. पैकी कृष्ण आंधळे हा एकमेव आरोपी अद्याप फरार आहे. तपास यंत्रणेला तब्बल पाच महिण्यांपासून गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे, त्याचे काय झाले या उत्तराचा कोढं प्रशासनासह तपास यंत्रणालाही उलगडलेलं नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तपास यंत्रणेच्या हाती पुरावे येण्यापूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात पोटतिडकीने मांडली आणि प्रकरणाला गती मिळाली. आमदार धस यांच्या मागण्यानुसार तपास यंत्रणा गठीत करण्यात आल्या. त्यानुसार एसआयटी, सीआयडी, न्यायालयीन समिती मार्फत तपास करण्यात आला. यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार यातील आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास यंत्रणेकडून दोषाआरोपत्र दाखल करण्यात आल्या नंतर मा.न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत भेट घेतल्या प्रकरणी आमदार धस यांच्यावर मनोज जरांगे यांच्याकडून टिकेची आगपाखड करण्यात आली. त्यावर माणुसकीच्या नात्याने भेट घेतल्याचे सांगत आमदार धस यांनी पुन्हा हे प्रकरण तेवढ्याच जोमाने लावून धरले. पण खोक्या प्रकरणावरुन एका गटाने आमदार धस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात मधेच कुवख्यात गुंड लॉरेंन्स बिश्नोई गँगची इंट्री झाली.
खोक्या भोसले हा आमदार धस यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत आमदार धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एका गटाकडून मोर्चे, आंदोलन, बंद पाळण्यात आला होता. मुंबई येथे आंदोलनाच्या आडून थेट लॉरेंन्स बिश्नोई गँगला मारण्याची सुपारी देवून त्यांना मुंबईत आणल्याचा आरोप आमदार धस यांनी केला. मुंबईच्या एका हॉटेलमधून पाच बिश्नोई गँगशी संबधीत पाच जणांना मुंबई पोलिसांणी ताब्यातही घेतले होते.
मात्र, तेव्हापासून आमदार धस यांनी बीड प्रकरणाबाबत माध्यमांपासून अबोला पाळला होता.पण आज जिल्ह्यातील एका कार्यक्रमा दरम्यान माध्यम प्रतिनिधींना आमदार धस यांना गाठल आणि संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी संतोष देशमुख हत्या, कारागृह प्रशासन, जिल्हा प्रशासनावर काही प्रश्न विचारले असता धस म्हणाले की, जिल्हा प्रशासनाला या आरोपी विषयी एवढं प्रेम का आहे, मोकाचे आरोपी इथं ठेवले आहेत आणि इतर आरोपींना इतरत्र हलविण्यात आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळेच्या सगळे आरोपी इथंच का ठेवले आहेत, या बाबत जेल प्रशासनाच्या बाबतीत काही पुरावे हाती येत आहेत, पुरावे हाती आल्यानंतर आम्ही तक्रार करू. यावर पत्रकारांनी विष्णू चाटे याने जिल्हा कारागृहास अर्ज केल्याचे सांगताच आमदार धस म्हणाले या इथंच या म्हणांव बीड कारागृह जेवणासाठी चांगल आहे.



Comments