राज ठाकरेच्या समोरच मनसे शिलेदारांचे ठाकरेंच्या सेनेबद्दल गंभीर आरोप; कामाला लागण्याचे राज ठाकरेंच्या सूचना
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

मुुंबई : मराठी भाषेच्या मुद्याच्या एकत्र आलेल्या ठकारे बंधूंनी मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढवली. सगळे मतभेद बाजूला ठेवून ठकारे बंधूंनी पालिका निवडणुक गाजवली. सत्ता आली नसली तरी ठकारे ब्रँड जिवंत असल्याचं दाखवून दिलं आहे. पण, पालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये कुरुबुरी आता चव्हाट्यावर आल्या आहेत. मनसेच्या शिलेदारांनी शिवसेनेनं आपल्याला मतद केली नाही, असा पाढाच राज ठाकरेंपुढे वाचला आहे. पण, राज ठाकरेंना आता कामाला लागा, असे आदेश दिले आहेत.
महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मूहाराष्ट्र नव निर्माण सेनेची बैठक मुंबईतील एमआयजी क्लब वांद्रे इथं पार पडली. या बैठकीत अध्यक्ष राज ठाकरे यांची पालिका निवडणुकीचा आढावा घेतला. मनसे पक्ष कुठे कुठे कमी पडला, याची माहिती राज ठाकरेंनी जाणून घेतली. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकार्यांबरोबर संवाद साधला. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काय काय घडलं, यावेळी पदाधिकार्यांनी त्यांच्या मनातील खदखद राज ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली.
“ आपल्याला योग्य जागा मिळाल्या नाहीत, शिवाय मिळालेल्या अनेक जागेवर ठकारेंच्या शिवसेनेकडून मतद झाली नाही. अपक्ष ही उमेदवार उभे करण्यात आले होते, अशी तक्रारच पदाधिकार्यांनी राज ठाकरेंपुढे मांडली. पदाधिकार्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर ‘ आता तक्रारी नको कामाला लागा’ अशी सूचनाच राज ठाकरेंनी पदाधिकार्यांना दिली. मराठीच्या मुद्यावर आणखी प्रभावीपणे काम करा, असा आदेशही कार्यकर्त्यांना दिला.
पालिका निवडणुकीतील सगळ्या मुद्यांवरप सविस्तर चर्चा झाली. पक्षांतर्गत मुद्दे होते, त्यामुळे ते ऑन कॅमेरा सांगणार नाही. राज ठाकरे यांनी कधीही तामिळ लोकांबद्दल बोलले नाही. त्यांनी केवळ अन्नामलाई यांच्याबद्दल बोलले होते. भाजपचे जे काही नेते आहेत त्यांना सांगा. अशा कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. आमची कुणाही बरोबर चर्चा झालेली नाही. पक्षांतर्गत बदल होत असतात तसे बदल होतीलच, असं यावेळी संदीप देशपांडेंनी सांगितलं.
मनसेचा भाजपला पाठिंबा नाही: मुंबई मापालिकेत मनसेकडून भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणारी अशी बातमी समोर आली होती. आज मुंबई महापालिका मुख्यालयात भाजप आणि शिवसेनेचे नवनिर्वाचीत नगरसेवक एकत्र गट नेता निवडीसाठी जमले होते. यावेळी मुंबईतील मनसेचे 6 नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली. पण ही बातमी खोटी आहे, मनसे भाजपला कधीच पाठिंबा देणार नाही, जे काही ते मी सांगेन, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच वृत्त फेटाळून लावलं.



Comments