top of page

राजस्थानमध्ये वायूसेनेचे विमान कोसळलं, वैमानिकाचा मृत्यू

ree

राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात वायूसेनेच्या एका विमानाचा मोठी दुर्घटना झाली आहे. रतनगडच्या भानुदा गावात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळलं. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमल्याच पाहिला मिळाले. शेतात लढाऊ विमानासारखे दिसणारे अवशेष आढळल्याने एकच खळबळ माजली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चुरुचे एसपी जय यादव यांनी दोन वैमानिकांच्या मृत्यूची पुष्टी केली असून ढिगार्‍याजवळ वाईटरित्या विद्रूप झालेल्या मृतदेहांचे तुकडे आढळले आहेत.


घटनेबद्दल स्थानिक लोकांशी संवाद साधल्यावर त्यांनी सांगितलं की, त्यांना आजूबाजूच्या परिसरातून एक मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर आवाजाच्या दिशेन पाहिल्यास त्यांना आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसून आले. हा स्फोट भानोदा गावानजीक घडल्याच स्थानिकांनी सांगितलं. या अपघातामागे नेमकं काय कारण याबद्दल वायूसेनेकडून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी झाल्यानंतरच अपघातामागील कारण अधिकृतपणे सांगण्यात येणार आहे.


तर चुरू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनी सांगितलं की, आज दुपारी 12:30 वाजता भारतीय वायूदलाचे लढाऊ विमान कोसळल्याची माहिती त्यांना मिळाली. प्राथमिकदृष्ट्या विमानात दोन वैमानिक असल्याची प्राथमिक माहिती त्यांना देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेविषयी अद्याप अधिकृत माहिती नसल्याचे ते म्हणाले.


गुजरात जामनगारच्या दुसरी मोठी घटना!

तीन महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यात गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात भारतीय वायूसेना दलाचे दोन आसनी जॅग्वार विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. हा अपघात जॅग्वार विमानाचे प्रशिक्षणार्थ उड्डाण घेत असताना झाला आहे.

Comments


bottom of page