राजीनामा देताना जयंत पाटील भाऊक; कधीच वेगळा गट केला नाही, साहेबांचा निर्णय मान्य केला
- Navnath Yewale
- Jul 15
- 2 min read

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. नवीन प्रदेशाध्यक्ष घोषणेच्या कार्यक्रमात बोलतांना जयंत पाईल यांनी त्यांच्या 7 वर्षातील कार्यकाळावर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना ते भावुक झालेले पहायला मिळाले. माझी कोणतीही संघटना नाही, मी वेगळा गट केला नाही. ना फाऊंडेशन काढलं, असल पाप कधीही केलं नाही. साहेब जो निर्णय देतील तो आम्ही स्वीकारला, आम्ही 25 वर्षे या पक्षात आहोत, या काळात आपण एकही दिवस सुट्टी घेतली नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नव्या प्रदेशाध्यक्षाच नावाची घोषणा केली. योवळी बोलताना ते भाऊक झाल्याचे दिसून आले. माझे सगळे गेले तरी मी साहेबांसोबत एकनिष्ठ रहाण्याचा निर्णय घेतला. या कार्यकाळात सात वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही. बायकोलाही ते सांगितलं, असं पाटील म्हणाले. दोन खासदार असलेला भाजप मोठा होऊ शकतो तर 10 आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
जयंत पाटलांनी भाषणाची सुरुवात करतानाच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज यादीत टाकण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच हिंदी सक्तीवरुन केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातल महायुती सरकारला टार्गेट केलं. सातार्यातील पुसेसावळी येथे धर्मांवरुन दंगल घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यावर आता कुठेतरी उत्तरेतील प्रभाव दिसू लागला आहे. उत्तरेतील काही राज्यातील लोकांना खूष करण्यासाठी हिंदी सक्तीचे प्रयत्न केले.
मुंबई महापालिा निवडणुकात एका विशिष्ठ समाजाला खूष करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभेला आपण खूप ताकद लावली परंतु यश मिळालं नाही. आता बिहारमध्ये सगळी मतदार यादी नव्याने करत आहेत. 35 लाख मतदार यांनी बाद केले, असं प्रत्येक राज्यात केलं जाईल. आता हे विविध राज्यात होईल, असा सभांव्य धोकाही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा किस्सा सांगताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत त्यांनी यात्रा काढली होती. या यात्रेची शेवटची सभा त्यांच्या मतदारसंघात होती. त्यावेळी पाऊस पडला होता. सगळे लोक निघून गेले होते. त्यामुळे त्यांना आपली अब्रू जातेय की काय असं वाटू लागलं होतं. मात्र पाऊस संपल्यानंतर मोठया संख्येने लोक सभेला आल्याचं जयंत पाटील म्हणाले.
पक्षाचा अध्यक्ष या नात्याने प्रत्ये मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न केला. माझी कोणतीही संघटना नाही, मी वेगळा गट केला नाही, वेगळं फाऊंडेशन काढलं नाही. असलं पाप कधीही केलं नाही. साहेब जो निर्णय देतील तो आम्ही स्वीकारला. आम्ही 25 वर्षे या पक्षात आहोत. साहेबांनी निर्णय घेतलेला असतो, त्यावेळी बराच विचार करून निर्णय घेतला असतो, असं जयंत पाटील म्हणाले. मी 2633 दिवस पक्षाचा अध्यक्ष आहे. शरद पवारांनी मला अध्यक्षपदाची दोनदा संधी दिली. इतके दिवस मी पक्षाचा अध्यक्ष आहे. आता ही योग्य वेळ आहे की मी आता या पदावरुन बाजूला व्हावं. असं जयंत पाटील यांनी नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा करताना म्हणाले.



Comments