top of page

राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबलाचे संकेत; आठ मंत्र्यांना मिळणार डच्चू

ree

राज्याच्या राजकारणात पडद्यामगील घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करणार असल्याचे शिवसेनेच्या मुखपत्रातून दावा करण्यात आला आहे. महायुती सरकारमधील 8 वादग्रस्त मंत्र्यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या ऐवजी काही नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याचेही आतल्या गोटातून बोलले जात आहे. यात भाजपचे दोन, शिंदे गटातील चार आणि पवार गटातील दोन मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभेत मिळालेल्या मोठ्या यशावर विराजमान होत राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र सरकार स्थापन झालयपासून महायुतीचे काही मंत्री आणि आमदार सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तन करत आहेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली जात आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमातही काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे दिसून आले. हीच बाब लक्षात घेता, आगामी स्थानिक स्वरांज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. इतर पक्षातील काही दिग्गजांना भापमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.


दरम्यान, गिरिश महाजन यांनाही पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. या फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यकता आहे. त्यांच्या जागी भाजपमध्ये सध्या नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या संभाव्य फेरबदलांमुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याच्या पहावयास मिळत आहेत.


यांना मिळू शकतो डच्चू

शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री भारत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.


तर अजित पवार गटातील सातत्याने वादग्रस्त ठरणार्‍या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. तसेच नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्सविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोर यांच्याडून सातत्याने वादग्रस्त वर्तन केले जात आहे. त्यामुळे त्यांचेही मंत्रिपद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

Comments


bottom of page