राज्याच्या मंत्रीमंडळात फेरबदलाचे संकेत
- Navnath Yewale
- Jul 20
- 1 min read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील काही सहकार्यांमागचे शुक्लकाष्ठ हटायचे नांव घेत नाही. दरम्यान, राष्ट्रवादी अजितपवार गट व शिवसेना शिंदे गटातील काही मंत्र्यांंचा यामध्ये समावेश आहे. भाजपमधीलही काही मंत्री यास अपवाद आहे. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सभागृहात रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडीओ समोर आला अन विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. रोहित पवार यांनी कोकाटेंचा व्हिडीओ पोस्ट करत सरकारला सवाल उपस्थित केला होता. तर आता संजय राऊत यांनी कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा केला आहे. अमित शाह यांनी राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदामधून वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचे नाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळातानाचा व्हिडीओ आल्यानंतर विरोधकांनी धारेवर धरले. सभागृहात रमी खेळतानाच्या घटना घडू नयेत, इथिकल कमिटीने याचा खुलासा करावा, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. कामकाज सुरू असताना रमी खेळातात, हे धन्य आहेत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. शेतकरी आत्महत्या होत असताना हे रमी खेळतात, असे म्हणज रोहित पवार यांनी कोकाटे यांचा व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. कोकाटेंचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सत्ताधार्यांवर विरोधकांनी घणाघाती टीका केली.
काय म्हणाले रोहित पवार
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणार्या शेतकर्यांची “ कभ गरीब किसानो की खेतीपर भी आओ ना महाराज ” ही आर्त हाक ऐकू येईल का?



Comments