राज्यात भाजप सरकारमुळेच लोकशाहीला गालबोट; निवडणुकीत गुंडगिरी, धमक्या, ब्लॅकमेलिंगचा असुरी प्रयोग- संजय राऊत
- Navnath Yewale
- Jan 3
- 2 min read

मुंबई : राज्यात भाजप सरकारमुळे लोशाहीला गालबोट लागत आहे, तर राज्यातील महापालिका निवडणुकांत व मुंबईतील निवडणुकांत धमक्या, ब्लॅकमेलिंग दहशतीचे गैरप्रकार सुरूच आहेत. कल्याण- डोंबिवलीत मोठा गोंधळ झाल्याचा गंभीर आरोप करत खासदार संजय राऊत यांनी बिनविरोध मिरवणूकां विषयी त्यांनी सरकावर तीव्र टीका केली आहे. म्हणाले.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना पक्षाचे एकून 66 नगरसेवक बिनविरोध घोषीत झाले आहेत. शिवाय राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षाचेही दोन नगरसेवक बिनविरोध घोषीत झाले. बिनविरोध नगरसेवक प्रक्रियेची निवडणूक आयोगाचने दखल घेतली असून निवडणुक निर्णय अधिकार्यांकडून अहवाल मागवले आहेत. दुसरीकडे बिनविरोध नगरसेवकांच्या विजयी मिरवणूका काढल्या जात आहेत. दरम्यान, मतदान प्रक्रियेपूर्वीच विजयी मिरवणूकांवर विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. एवढे नगरसेवक इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध झाले कसे? भाजपकडून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी गुंडगिरीचा चा अवलंब करण्यात आला, आजही उमेदवारांना धमकावण्यात येत आहे. पण आम्ही धमक्यांना भिक घालणारे नाहीत, तुमच्या छातावर बसून भगवा फडकवू असा सज्जड इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
राऊत म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठा गोंधळ झाला आहे, तिकडे मिरवणूका काढताहेत, कल्याण- डोंबिवली त्यांच्या बापाची आहे काय? असा सवाल करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला धमकावल्याचा आरोप केल्या प्रकरणांवर संजय राऊत यांनी मनपा आयुक्तांनी यावर उत्तर द्यावे, या प्रकरणाची चाृैकशीची मागणीही केली.
राज्यातील छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाण्यातील काही प्रकरणे, जळगाव किडनॅपिंगचं प्रकरण या आणि अशा राज्यातील सर्व गुन्हेगारी व दहशतीच्या घटनांचा हवाला देत सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच हे चित्र असल्याचे राऊत म्हणाले. उमेदवारांना जबरदस्तीने माघार घ्याला लावणे, बिनविरोध निवडणुन आणण्याची स्पर्धा धमक्या, ब्लॅकमेलिंग, दहशत हे सर्व गैरप्रकार देशातील लोकशाहीची प्रतीमा मलीन करणारे आहेत, या प्रकरणामुळे देशातील लोकशाहीला भाजपा सरकार मलीन करत आहे.
मुंबईतील मनपा आयुक्त आणि राज्याचे भाजपा सरकारचे मुख्यमंत्री काय करत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यात यापूर्वी कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवार बिनविरोध निवडून आलेच नव्हते जरा आम्ही बघू निवडणूक तर होवू द्या असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, ठाण्यात 125 पैकी मविआचे बहुतांश अर्ज बाद करण्यात आल्याची चर्चा असून, अंबादास दानवे यांनीसुद्धा सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षातील उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत. 31 डिसेंबर 2025 व 1 जानेवारी 2026 ला ठाण्यातील मुख्य नेते आणि मुख्य अधिकार्यांच्या गाड्या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात लागल्या होत्या. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. असं सांगत ‘ ठाणे, कल्याण डोंबिवली ही स्पर्धा भाजपा आणि शिंदे गटात असून राज्यातील निवडणूक आयोगाचा भाजपा सरकारकडून गैरवापर केला जात आहे.या राज्यातील निवडणूक आयुक्तांनी नावाला जागावे. मी कालही बोलतोय, हे त्यांना सामील आहेत की काय? काय करतायत काय कोणती यंत्रणा राबवतायत? हे निवडणुक अधिकारीच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमक्या देत आहेत, कारण त्यांच्यावर तेथील पालकमंत्र्याचा दबाव असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.



Comments