रायगडच्या समुद्रात बोट बुडाली
- Navnath Yewale
- 11 hours ago
- 1 min read
बोट गुजरातमधील मच्छीमारांची , सात खलाशांना वाचवण्यात यश

मागील तीन दिवसांपासून मुंबई, उपनगर तसेच सागरी किनार्यावरील भागांत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे समुद्रालाही आता उधान आले आहे. दरम्यान समुद्राला उधान आलेले असताना रायगडमधील उरण येथे एक बोट दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारी बोट असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बोट दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रायगडमधील उरण या भागात ही बोट दुर्घटना झाली आहे. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारांची आहे. ही दुर्घटना झाल्यानंतर बोट थेट बुडाली आहे. या बोटीचा आता शोध घेतला जात आहे. ही बोट अजूनही मिळालेली नाही. समुद्राचे पाणी शिरल्यामुळे ही बोट सुमद्रात बुडाल्याचे म्हटले जात आहे. या बोटीमध्ये काही मच्छीमार होते. या मच्छीमरांना शोधण्याचा आणि त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
समुद्रात बुालेल्या या बोटीत एकून सात खलाशी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या खुलाशांना वाचवण्यात यश आले आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या खलाशांना वाचवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर केला गेला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना अलिबागमध्ये घडली होती. या बोट दुर्घटनेत एकून तिघांचा मृत्यू झाला होता तर सहा जणांना वाचवण्यात यश आले होते. सध्या समुद्राला उधान आलेले आहे. त्यामुळे अशा स्थितीत मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असते. मात्र तरीदेखील आदेश झुगारून काही मच्छीमार मोस पकडायला समुद्रात जातात. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असल्याचे म्हटले जात आहेत.
उरणमधील बोट दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दुर्घटनाग्रस्त बोट समुद्राच्या पाण्यात हेलकावे खाताना दिसत आहे तर काही लोक लाईफ जॅकेट परिधान करून दुर्घटनाग्रस्त बोटीतील मच्छीमारांना वाचवताना दिसत आहेत. सध्या सर्व सात खलाशांना वाचवण्यात यश आले आहे.
Comments