राष्ट्रवादी (अ.प) पक्षाकडून खड्ड्यांतून निषेधाची पेरणी आंदोलन
- Navnath Yewale
- Aug 23
- 1 min read

जव्हार: जव्हार नगरपरिषदच्या मुख्याधिकारी यामिनी कांबळे यांना निवेदन देऊन गलथान कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून जोरदार हल्ला चढवला आहे. शहरातील रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास आणि प्रशासनाचा दुर्लक्ष यावर लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी कडून कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं.
जव्हार शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्येच प्रतिकात्मक भात लावणी करत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यात आला. "जर रस्ते नसेल तर शेत म्हणूनच वापर करावा लागेल" अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
या आंदोलनाने जव्हार नगरपरिषद हद्दीतील शहरात खळबळ उडाली असून नागरिकांनी देखील या उपक्रमाचे समर्थन करत प्रशासनाला सजग होण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलाकर धूम, सरचिटणीस कमलजीत धान मेहेर, विधानसभा अध्यक्ष एकनाथ दरोडा, जवळ तालुकाध्यक्ष वैभव अभयंकर, जव्हार अध्यक्ष अशरफ घाची, विकास गायकवाड, अमोल बर्वे कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments