राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांचा राजीनामा
- Navnath Yewale
- Jul 21
- 1 min read

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रवक्ते तथा युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांना छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण प्रकरणं चांगलच आंगलट आलं आहे. पक्षाचे सर्वेसार्वा अजित पवार यांनी सकाळी तातडीने सुरज चव्हाण यांना मुंबईला बोलावून त्यांचा राजीनामा घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात काल रविवारी (20 जूलै) पत्रकार परिषदेनंतर छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण केली होती. विजय घाडगे यांच्या मारहाण प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले छावा संघटनेकडून सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली. विजय घाडगे यांना मारहाण प्रकरणाचा मराठा संघटनां आक्रमक झाल्या आहेत.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाचा जोरदार निषेध करत अजित पवार यांना थोडी शरम असेल तर आशा लोकांना तात्काळ पदावरुन बडतर्फे करण्याची मागणी केली होती.
लातूर येथील घडलेल्या प्रकाराबद्दल सुरज चव्हाण यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांसमोर येत मारहाण दिलगिरी व्यक्त केली होती. पण अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांना तातडीने मुंबईला बोलावले होते, सूत्रांच्या माहितीनुसार सुरज चव्हाण यांचा प्रवक्ते व युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे.
Comments