top of page

राहुल गांधी नंतर रोहित पवारांचाही बोगस मतदरांबात खुलासा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषदेत कागदपत्रांसह कर्नाटक मधील बंगळुरु लोकसभा मतदार संघातील माधवपूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदारांच्या आधारे मत चोरीचा आरोप केला. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनीही महाराष्ट्रात बोगस मतदार नोंदीचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ree

अमरावती: लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीसह देशातील विविध विधानसभा मतदारसंघात मतं चोरी झाल्याचा आरोप काही कागदपत्रांच्या आधारे केला. त्यानंतर देशभरता यावरुन बीच खळबळ माजली. याच धर्तीवर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील काही बोगस मतदारांचे खुलासे केले आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातील हे प्रकरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबत महिती दिली आहे. ते म्हणतात. मतदार यादीत बोगस नावं कशा प्रकारे घुसवली जातात याचं सविस्तर प्रेझेंटेशन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच केलं. राज्यात याचा नमुना बघायचा असेल तर शिरुर विधानसभा मतदारसंघातील काही संशयित मतदारांची शहानिशा करण्याची मागणी राष्ट्रवादीचे उदेमवार अशोक बापू पवार यांनी निवडणूक आयोगाकडं केली होती. याच्या पडताळणीनंतर मतदार दिलेल्या पत्यावर राहत नसल्याचं निवडणूक आयोगानं मान्य केलं. मात्र, त्याची नोंद कशी झाली याबाबत हात झटकले आणि यांच खापर ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेवर फोडलं.

धन्य तो निवडणूक आयोग आणि धन्य ती मतदार नोंदणी प्रक्रिया!


एक बरं झाल, संबंधित मतदार दिलेल्या पत्यावर राहत नसल्याचं तरी निवडणूक अयोगानं मान्य केलं. पण राज्यभरात असे बनावट मतदार किती असतील, याची जबाबदारी कोण घेणार? असे सवालही यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.


Comments


bottom of page