रुपूरमध्ये बिबट्याचा महिलेवर हल्ला ! महिलेच्या प्रसंगावधानमुळे अनर्थ टळला; जखमी महिलेवर शिरुरच्या आरोग्य केंद्रात उपचार, प्रकृती स्थिर
- Navnath Yewale
- Jan 21
- 2 min read

बीड: रुपूर (ता. शिरुर कासार) शिवारात शेतात कापुस वेचणार्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात महिलेच्या गळ्यावर,चेहर्यावर आणि हाताला जबर जखमा झाल्या.हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले जखमी महिलेवर शिरुरच्या प्रथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
रुपूर शिवारातील वाघोबाच्या शेतात मणकर्णा शिवराम नेटके वय (55 वर्षे) या कापुस वेचणी करीत असताना दुपारी साधारण 1:00 च्या सुमारात दबाधरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने प्रथम पंजाने त्यांच्या मानेवर गालावर आणि हतावर हल्ला चढवला. मात्र, भेदरलेल्या अवस्थेत मणकर्णा नेटके यांनी बिबट्याच्या हल्ल्यास प्रतिकार केला. मणकर्णा नेटके यांच्या प्रतिकारामुळे बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, मणकर्णा यांच्या मानेला स्कार्प गुंडाळलेला असल्याने पुढील अनर्थ टळल्याचे वनकर्मचारी यावेळी म्हणाले. हल्ल्याची माहिती मिळताच वनरक्षक एन. के. काकडे, वनमजुर आंबदास लवांडे, सोपान येवले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून पायाचे ठशांवर माग काढण्याचा प्रयत्न केला. दराम्यान, पायाच्या ठस्यावरून बिबट्या असल्याच्या निष्कर्ष काढण्यात आला.
पाटोदा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी आमोल घोडके, वनपाल श्री देवगूडे यांनी घटनास्थळाची पाहाणी करून परिसरात बिबट्याचा काढण्याचा प्रयत्न केला. मणकर्णा नेटके यांना जखमी अवस्थेत शिरूरच्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला: कापुस वेचत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचनाक हल्ला चढवला. भेदरलेल्या अवस्थेत राक्तबंबाळ होवूनही मणकर्णा यांनी बिबट्याचा हल्ल्यास जोरदार प्रतिकार केला. हल्ल्यासाठी आंगावर झेपालेल्या बिबट्याला दोन्ही हाताने दूर फेकल्याने बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. मणकर्णा यांच्या तत्परतेबरोच धाडसामुळे पुढील अनर्थ टळला.
आधिवास निश्चित करून पिंजरा लावणार: रुपूर शिवारात महिलेवर बिबट्यानेच हल्ला केल्याचे स्थळपाहाणीवरून सिद्ध झाले आहे. लवकरच परिसरात ट्रॅपकॅमेरे लावून आधिवास निश्चित करण्यात येईल. अधिवास निश्चितीनंतर तात्कळा पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यत येणार आहे. परिसरातील शेतकरी, महिलांनी एकट्याने शेतात थांंबणे टाळावे. शक्यतो गळ्याभोवती जाड मफलर अथवा इतर गरमीचे वस्त्र बांधूनच शेतात जावे. आसपास बिबट्याची चाहूल लागताच वनविभागास संपर्क करावा.
आमोल घोडके
वनपरिक्षेत्र अधिकारी
वनपरिक्षेत्र कार्यालय पाटोदा



Comments