रोहितने अत्यंत पारदर्शक प्रश्न मांडले, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे वाट पाहू- सुुप्रिया सुळे
- Navnath Yewale
- Feb 12
- 2 min read

नवी दिल्ली: अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला असताना आता त्यांचे पुतने आणि राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसर्या दिवशी घाईगडबडील अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. रोहित पवारांच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शब्द दिला आहे की, या सगळ्याची ते चौकशी करतील. रोहित पवारांची अस्वस्थता सहाजिक आहे. त्याने अतिशय पारदर्शकपणे प्रश्न मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती घेऊन, पारदर्शक चौकशी करतील त्यामुळे या चौकशीची वाट पाहू, असं सुप्रिया सुळें म्हणाल्या. तसेच रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेत पूर्व विदर्भातील नेत्याचं नाव घेतलं आहे. मात्र त्याबद्दल मला माहिती नाही. असंही संप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार सुळे पुढे म्हणाल्या की, मी आणि सुनेत्रा वहिनी यापूर्वीही डीपीडीसीला एकत्र होतो. सुनेत्रा वहिनींवर ही नवीन जबाबदारी आहे. एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद आहे. सुनेता वहिनी पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे. मात्र अजितदादा नसल्याचं दु:खही आहे. अजितदादा नसण्याचं दु:ख कधीच भरून निघणारं नाही. आजही खरं वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाही. आमचं कुटुंब सध्या अडचणीतून जात आहे.
शरद पवार यांच्या तब्येतीवर बोलताना सुप्रीया सुळे म्हणाल्या, शरद पवारांची तब्येत खूप चांगली आहे. रूबी हॉल रुग्णालयाच्या स्टाफचे मी आभार मानते. शरद पवारांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. शरद पवार जेव्हा हॉस्पीटलमध्ये होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केले होते. अजितदादानंतरच्या काळातही या सगळ्यांनी आमची साथ दिली त्याबद्दलही मी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आभार मानते असं खासदा सुप्रिया सुळे म्हणाल्या .



Comments