लक्ष्मण हाके यांच्यावर बारामतीत गुन्हा दाखल
- Navnath Yewale
- Sep 10
- 1 min read

बारामती: ओबीसी नेते यांनी बेकायदा जमाव जमवल्या प्रकरणी बारामती पोलिसांत लक्ष्मण हाके यांच्यासह इतर 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिस ठाण्यातही हाकेंसह 17 जणांवार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर बीडच्या गेवाराई पोलिसांत बेकायदा जमाव जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बारामतीतही लक्ष्मण हाके यांच्यासह इतर 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणा विरोधात राज उठवणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. ठिकठिकाणी हाके यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. मागील आठवड्यात लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या विरोधात आरोप करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
हाके यांच्या टीकेला उत्तर देत आमदार पंडित समर्थकांनी हाके यांच्या पुतळ्याचे दहन करत हाके यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. अमदार समर्थकांना चॅलेंज देत हाके यांनी दुसर्या दिवशी गेवराई गाठून समर्थकांसह आमदार पंडित यांच्यावर टीकेची झोड उठवली. दरम्यान, आमदार पंडित यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करत हाके यांनी दंड थोपटून आमदार पंडित यांना आव्हान दिले होते.
गेवराई पोलिसात हाके यांच्यासह 17 जणां विरोधात गेवराई पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता बारामती येथेही हाके यांच्याह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा आक्षणा प्रश्नी शरद पवार, अजित पवार यांच्यावर आरोप करत लक्ष्मण हाके यांनी बारामती येथे ओबीसींचा मोर्चा, सभाचे अयोजन केले होते. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत सभेत हाके यांनी पवार बंधूवर सडकून टीका करत मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने काढलेला जीआर रद्द करण्याची मागणी केली होती. हाके यांच्या मोर्चा, सभेला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारली होती. दरम्यान, पोलिसांच्या परवानगीला न जुमाता हाके यांनी मोर्चा काढत सभा घेतली होती. बेकायदा मंडळी जमवल्या प्रकरणी बारामती पोलिसांत हाके यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Comments